Kiran Mane : अभिनेता किरण मानेची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश
अभिनेता किरण मानेने राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर जाऊन किरण माने शिवबंधन बांधणार आहे.
ADVERTISEMENT
Kiran Mane Latest News : आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत राहणारा मराठी अभिनेता किरण माने राजकारणात पाऊल ठेवणार आहे. किरण मानेने राजकीय पदार्पण करण्यासाठी पक्षही निश्चित केला आहे. किरण माने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधणार असून, मातोश्रीवर हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे.
ADVERTISEMENT
‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी’ या मराठी शोसह ‘टकाटका’, ‘रावरंभा’, ‘स्वराज्य’ या चित्रपटात भूमिका साकारणारा मराठी अभिनेता किरण माने त्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो आता राजकारणातच पाऊल ठेवणार आहे.
उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित किरण माने पक्षप्रवेश करणार आहे. आज (7 जानेवारी) मातोश्रीवर इतर पक्षातील नेत्यांच्याही ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यात किरण माने यांचाही समावेश आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> पुर्ववैमनस्य अन् 20 वर्षीय मास्टरमाईंड, पुणे पोलिसांनी सांगितला हत्याकांडाचा थरार
बीड जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसेचे घाटकोपर उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगमही ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे इतर पदाधिकाऱ्यांसोबत अभिनेता किरण मानेच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश देणार आहेत.
हेही वाचा >> राऊतांना बाळासाहेब म्हणाले, ‘चुपचाप काम कर…’ निरुपमांनी सांगितला राज्यसभा निवडणुकीचा ‘तो’ किस्सा
‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढण्याचा वाद
किरण माने स्टार प्रवाह या दूरचित्रवाणीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका करत होते. त्यांना 2022 मध्ये मालिकेतून काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावरील पोस्टमधून भाजपविरोधात भूमिका घेतल्याने मालिकेतून काढल्याचा आरोप मानेनी त्यावेळी केला होता. हा वाद बराच गाजला होता. त्यानंतर ते सोशल मीडियातून सातत्याने भूमिका मांडत आहे. आता राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT