Bigg Boss Marathi : निक्की रडरड रडली...बिग बॉसने अरबाजला दाखवला बाहेरचा रस्ता
Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेल घराबाहेर पडले आहेत. एलिमिनेशनमध्ये अरबाज सोबत निक्की डेंजर झोनमध्ये निक्की तांबोळी होती. मात्र निक्की तांबोळी ही सेव्ह झाली आहे आणि अरबाज पटेल हा घराबाहेर पडला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अरबाज पटेल घरातून आऊट
अरबाज आऊट झाल्याने निक्की प्रचंड रडली
अरबाजच्या चाहत्यांना याचा मोठा धक्का बसलाय
Arbaaz Patel Eliminate : बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेल घराबाहेर पडले आहेत. एलिमिनेशनमध्ये अरबाज सोबत निक्की डेंजर झोनमध्ये होती. मात्र निक्की तांबोळी ही सेव्ह झाली आहे आणि अरबाज पटेल हा घराबाहेर पडला आहे.दरम्यान अरबाजला सेव्ह करण्यासाठी निक्की रडली देखील होती. मात्र बिग बॉ़सने कोणतीही दयामाया न दाखवला अरबाजला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (bigg boss marathi arbaaz patel out of bigg boss marathi season 5 house nikki tamboli cry bhaucha dhakka reteish deshmukh)
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी एक सदस्य या आठवड्यात एलिमिनेट होणार होता. त्यानुसार आज सकाळीच कलर्स मराठीने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोत सुरज चव्हाण, वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर सेव्ह झाल्याचे दाखवण्यात आले होते. तर अरबाज आणि निक्की हे डेंजर झोनमध्ये होते. त्यामुळे या दोघांमधून कोण घराबाहेर जाणार? याची चर्चा होती.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, तुमच्या 'या' खात्यात 4500 होणार जमा?
अरबाज आणि निक्की हे शेवटच्या क्षणी डेंजर झोनमध्ये होते. प्रेक्षकांना एका क्षणाला वाटलं होतं, दोघांना डेंजर झोनमध्ये नेऊन इलिमिनेशची हुलकावणी दिली जाईल. पण तसे काहीच घडले नाही आणि सरळ सरळ बिग बॉसने अरबाजला घराबाहेर काढले. या दरम्यान निक्की तंबोळी अरबाजच्या गळ्यात पडून प्रचंड रडली. तिने बिग बॉसला अरबाज सेव्ह करण्याची विनंती देखील केली. पण अखेर बिग बॉसने त्याला बाहेर काढलचं.त्यानंतर डॉ. साबळे यांनी अरबाजला त्याच गेममध्ये नेमकं काय चुकलं? असा सवाल केला होता. यावर अरबाजने मी स्ट्रॉग कटेंडर होतो. माझा गेम वीक असल्याचं कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे अरबाज बिग बॉसच्या या निर्णयाशी नाखुश दिसला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अरबाजने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेताना त्याच्या म्युचुअल फंडमधले सर्व २०० कॉइन्स निक्कीला दिले. याशिवाय घरात कॅप्टन झालेला सदस्य पहिल्यांदाच एलिमिनेट झाल्याची घटना बिग बॉस मराठीच्या इतिहासात घडली आहे. अरबाज पटेलला आठव्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे अरबाज घराबाहेर झाल्यास ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन झालेल्या सदस्य घराबाहेर झाल्याची घटना घडेल असं बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं होतं.
हे ही वाचा : Ajit Pawar : ''माझा दौरा रद्द करणारा अजून...'', पक्षातील नेत्यालाच अजित पवारांनी झापलं
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. त्यामुळे आता घरातली स्पर्धा दिवसागणिक उत्कंठावर्धक होत चालली असल्याचं पाहायला मिळतंय. इतकचं नव्हे तर बिग बॉसचा 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे येत्या 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा खेळ संपणार असल्याचंही म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT