Gautami Patil: गौतमी पाटीलला जामीन मंजूर, पण... का चढावी लागलेली कोर्टाची पायरी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

gautami patil gets bail from ahmednagar district court what was the case dancer gautami patil lavani
प्रसिद्ध रिलस्टार आणि डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डान्सर गौतमी पाटीलला जामीन मंजूर

point

अहमदनगर कोर्टाने केला जामीन मंजूर

point

गौतमी पाटीलला कोर्टाचा मोठा दिलासा

Gautami Patil Gets Bail : प्रसिद्ध रिलस्टार आणि डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिचे कुठेच चर्चाच नव्हती. ना लावणीचे शोमध्ये दिसली, ना कुठल्या राड्यात. पण अचानक आज तिला अहमदनगर जिल्हा न्यायालयात (Ahmednagar District Court) हजर राहावं लागलं. आणि कोर्टाने तिची बाजू एकून घेत तिला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गौतमी पाटीलला दिलासा मिळाला आहे. पण तिला नेमक्या कोणत्या कारणाने कोर्टाची पायरी चढावी लागली? हे जाणून घेऊयात. (gautami patil gets bail from ahmednagar district court what was the case dancer gautami patil lavani) 

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर अल्पावधीतच गौतमी पाटील (Gautami Patil) प्रसिद्धी झोतात आली होती. तिच्या लावणीची क्रेझ तरूणांमध्ये खूप होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिची लावणी पाहायला तरूण मंडळी जमायची. या दरम्यान हुल्लडबाजी आणि अपघाताच्या घटना देखील घडायच्या. 

एकदा तर तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलावर जाऊन कार्यक्रम पाहत होती. त्यामुळे एक जण कौलावरून थेट खाली कोसलळा होता. आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. यासह एका सिमेंटच्या पत्रावर उभे राहून काही तरूण कार्यक्रम पाहत होते. यावेळी पत्र्यावर वजन जास्त झाल्याने सिमेंटचे पत्रे तुटले होते आणि तरूणांचा मोठा अपघात झाला होता. या सर्व घटनानंतरही तिच्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी सुरु होती. मात्र तसे काहीच झाले नाही आणि तिची लावणी सुरुच राहिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Shiv Sena Vs BJP: चव्हाण आणि कदम का भिडले?, विधानसभेआधी शिवसेना-भाजपमध्ये काय बिनसलं?

गौतमी कोर्टात कशी पोहोचली? 

अहमदनगरमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. याच कार्यक्रमामुळे  गौतमी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटीलला आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागणार होतं. त्यानुसार गौतमी आज कोर्टात हजर झाली. यावेळी न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.

 गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केलं होतं. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही केस कोर्टात पोहोचल्यानंतर आज गौतमीला अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गौतमीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचं टेंशन मिटलं! डायरेक्ट खात्यात 4500 होणार डिपॉझिट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT