Vijay Kadam : मृत्यूशी झुंज अपयशी! ज्येष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड

मुंबई तक

ADVERTISEMENT

अभिनेते विजय कदम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन.
मराठी अभिनेते विजय कदम.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

point

कर्करोगाच्या आजाराने होते त्रस्त

point

कर्करोगाच्या आजारातून सावरत असतानाच निधन

Actor Vijay Kadam : मराठी चित्रपटसृष्टी, मालिका तसेच रंगभूमीवर विविध भूमिका साकारणारे अभिनेते विजय कदम यांचे आज मुंबईतील राहत्या घरी दुःखद निधन झाले. नुकतेच ते कॅन्सरच्या आजारातून बरे झाले होते. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. (veteran actor Vijay Kadam has passed away)

अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी (10 ऑगस्ट) दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. 

विजय कदम यांचा जीवनप्रवास

‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विजय कदम यांनी लहान असताना ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असे. 

कदम होते तत्वज्ञानाचे पदवीधर

कलावंत म्हणून विजय कदम यांची जडणघडण झाली ती डॉ. शिरोडकर हायस्कूल मध्ये. या शाळेतील तळाशिलकर, सावंत महाजन आणि परब सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्या वेळी विजय कदम यांना मिळाले.विजय कदम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून घेतले. ‘तत्वज्ञान’ हा गंभीर विषय घेऊन ते पदवीधर झाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पुण्यात पुन्हा हिट अँड रन, दुचाकीला नेलं फरफटत; थरारक व्हिडिओ

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा काम करतांना व्यावसायिक दिग्दर्शकांच्या समवेत काम करण्याची संधी तर लाभली. महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते डेव्हीड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले होते. 

ADVERTISEMENT

नाटकांमध्ये साकारल्या अनेक भूमिका

विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे  ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला.

हेही वाचा >> अजितदादांचा पॅटर्नच वेगळा, आता गुलाबी जॅकेट नाही तर थेट... 

रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली. विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा' चे प्रयोग करत आहेत. या लोकनाट्याचे १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले आहेत.

‘खुमखुमी’ एकपात्री प्रयोग

ते अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेतर्फे ‘खुमखुमी’ हा मनोरंजनाचा अडीच तासाचा कार्यक्रम सादर करतात. या खुमखुमी च्या माध्यमातून त्यांनी अनेक  सामाजिक संस्थांना व गरजू अपंगाना मदत केली आहे. 

या चित्रपटात साकारल्या भूमिका

राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, ऑन ड्युटी २४ तास, वासुदेव बळवंत फडके, रेवती,  देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी,  कोकणस्थ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली होती. सही रे सही, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे, विछ्या माझी पुरी करा, खुमखुमी ही देखील त्यांची गाजलेली नाटके.

हेही वाचा >> आजीच्या पेन्शनसाठी नातेवाईक भिडले, बँकेत रक्ताचा सडा; कल्याण हादरलं! 

विजय कदम यांनी पार्टनर, गोटया दामिनी, सोंगाडया बाज्या, इंद्रधनुष्य घडलयं बिघडलयं अशा अनेक मराठी मालिका व श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दिक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अभिनय केला आहे. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीत अभिनय केला आहे.विजय कदम यांच्या पत्नी ‘पद्मश्री जोशी’ पण अभिनेत्री आहेत. विजय कदम यांच्या नाटकात काम करताना पद्मश्री यांच्याशी ओळख झाली. 

‘नणंद भावजय’ या चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली आहे. ‘चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजले होते. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा हे पद्मश्री यांचे इतर चित्रपट. ‘पद्मश्री कदम’ या पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. विजय कदम यांचा मुलगा गंधार हा एक गायक आहे. त्याने पोश्टर बॉईज आणि चित्रपटामधील गाणी गायली आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT