Adipurush चित्रपटामुळे लोक का चिडलेत? या व्हायरल Memes मध्ये दडलंय उत्तर

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Bollywood Adipurush movie has sparked a discussion
Bollywood Adipurush movie has sparked a discussion
social share
google news

Adipurush Film : सध्या बॉलिवूडमध्ये ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रिलीज होताच चर्चेला उधाण आले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने (Prabhas) काम केले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. महाकाव्य रामायणावर (Ramayan) आधारित, ‘आदिपुरुष’ मध्ये भगवान राम आणि माता सीता यांचा वनवास आणि रावणाशी रामाचे युद्ध दाखवण्यात आले आहे. पण, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये जेवढा उत्साह होता, तो सर्व मातीमोल झाला आहे. (people angry and Funny Reaction on Adipurush movie memes Get viral)

ADVERTISEMENT

आतापर्यंत, पडद्यावर पाहिलेल्या रामायणाच्या अवतारांपैकी हा अवतार सर्वात वेगळा आहे. ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी त्यात अनेक मोठ्या चुका केल्या आहेत. यामुळे यावर अनेक मीम्सही बनवण्यात आलेल्या आहेत. हा चित्रपट लोकांचं मन जिंकू शकला नाही. काहींनी तर यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Nagpur हादरलं, बेपत्ता 3 चिमुकल्यांचे कारमध्येच सापडले मृतदेह; नेमकं काय घडलं?

Adipurush वर बनल्या एकापेक्षा एक मीम्स, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या

प्रभास आणि क्रिती सेनॉनचा आदिपुरुष या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आदिपुरुषचा टीझर लॉन्च झाल्यापासून तो ट्रोल व्हायला सुरूवात झाली. आता त्याच्या रिलीजबरोबरच सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. या चित्रपटावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

एक प्रेक्षक म्हणाला की, ‘जे रामायण आपण लहानपणापासून पाहिले आहे त्याची बरोबरी हा चित्रपट करू शकणार नाही. VFX चांगली गोष्ट आहे पण काही ठिकाणी अ‍ॅनिमेशन असं दाखवलं आहे की वानरं धावत आहेत हे कार्टूनसारखं दिसत आहे. रामायण हे आपल्या संस्कृतीचं ग्रंथ आहे त्यामुळे कार्टूनप्रमाणे दाखवणं हे योग्य वाटत नाही.’

टीना दाबीची बहीण IAS Riya Dabi ने गुपचूप केलं लग्न, नवरदेव कोण?

दुसरा प्रेक्षक म्हणाला, ‘आतापर्यंत मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट सर्वात वाईट आहे. ज्याप्रमाणे यामध्ये डायलॉग्स वापरण्यात आले आहेत ते अगदी सामान्य भाषेतील आहेत. रामायणासारखी कोणती गोष्ट नाही आहे. रावणाचा अवतार तर अगदी विचित्र आहे. त्याकडे रावण म्हणूनही पाहता येत नाही.’

ADVERTISEMENT

90 च्या दशकात रामायण या टिव्ही मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेता अरूण गोवील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘जिथपर्यंत व्हिज्युअल्स आणि इफेक्ट्सची गोष्ट आहे, त्यामध्ये कोणतीही समस्या होत नाही. ते आपल्या मनाशी जोडलेले असतात. जेव्हा आपण ते पाहातो तेव्हा ते आपल्याला आवडतात किंवा नाही आवडत. हे त्याबद्दल नाहीये. गोष्ट आहे ती आपल्या चरित्रांची आहे. आपल्या चरित्रांना कशाप्रकारे सादर केलं गेलं आहे. ज्यामध्ये मला समस्या वाटते. कारण, भगवान रामाला तुम्ही आधुनिक पद्धतीने दाखवू शकत नाही. तुम्ही हनुमानाचं रूप आधुनिक पद्धतीने कसं दाखवू शकता? जे त्यांचं स्वरूप होतं तेच त्यांनी ठेवलं पाहिजे होतं.’

ADVERTISEMENT

चित्रपटातील अभिनेत्यांच्या लुक्सवरून वाद…

‘आदिपुरुष’ मधील रावणाच्या लुकची चर्चा सातत्याने होत आहे. रावणाला फॉक्स हॉक हेअरकटमध्ये पाहणे हे प्रत्येकाला विचित्र वाटत आहे. पण त्याला पुष्पक विमान नव्हे तर वटवाघुळाच्या विमानावर पाहणं अधिकच विचित्र वाटतं. जानकीच्या वनवासातील कपड्यांचा रंगही वेगळा आहे.

Pune : MPSC मध्ये सहावा क्रमांक! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा सापडला मृतदेह

सोन्याची लंका की काळ्या दगडाची?

रावणाने कुबेराकडून सोन्याची लंका काबीज केली होती. लंका सोन्याची होती हे सर्वांना माहीत आहे. पण ‘आदिपुरुष’मधली रावणाची लंका पाहून प्रेक्षकांना धक्का बसला. ही लंका सोन्याची नाही. लंकेतील रावणाचा महाल काळा आहे. त्याचे आतील आणि बाह्य भाग काळे आहेत. लंकेत ठेवलेले सामानही काळे असते. अशोक वाटिकाही काळ्या पाषाणापासून बनलेली आहे, ती अजिबात बागेसारखी दिसत नाही. अशोक वाटिकेत चेरी ब्लॉसमची झाडे लावली आहेत, याशिवाय इतर झाडे नाहीत. लंकेतील नदी आणि तलावाचे पाणीही काळे आहे. पण चित्रपटात ही काळीलंका ‘सोन्याची’ म्हटलं गेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT