Allu Arjun Arrested: 'पुष्पा 2' चा सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक का झाली? नेमकं घडलंय तरी काय?
Allu Arjun Arrested In Sandhya Theatre Stampede Case : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला अटक
त्या प्रकरणात अल्लू अर्जुनवर पोलिसांनी केली अटकेची कारवाई
संध्या थिएटरमध्ये नेमकं घडलंय तरी काय?
Allu Arjun Arrested In Sandhya Theatre Stampede Case : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनवर अटकेची कारवाई केली आहे. 4 डिसेंबरला चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. यावेळी चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अल्लू अर्जुन आणि थिएटर प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरच्या सायंकाळी पुष्पा 2 चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अल्लू अर्जुन या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अर्जुनच्या जबरा चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ही करावा लागला होता. या चाहत्यांना भेटण्यासाठी अल्लू अर्जुन त्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक धावले आणि त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हे ही वाचा >> LIC Bima Sakhi Yojana : विमा सखी योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र? लाडक्या बहिणींसाठी सविस्तर माहिती एका क्लिकवर
लोकांच्या गर्दीत एक लहान मुलगा बेशुद्ध झाला होता आणि 35 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही महिला तिच्या कुटुंबासह पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली होती. या घटनेवर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन म्हणाला, संध्या थिएटरमध्ये अशा प्रकारची घटना घडायला नको होती. मी संध्या थिएटरमध्ये गेलो होतो. मी पूर्ण चित्रपट पाहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला मॅनेजरने सांगितलं की, खूप गर्दी आहे, आपण इथून निघालो पाहिजे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT