Nitin Desai: ‘आराम केला अन् दुसऱ्या मजल्यावर जाऊन घेतला गळफास’, देसाईंच्या मित्राने सांगितली स्टोरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

art director nitin desai commit suicide friend dilip reveals inside nd studio story
art director nitin desai commit suicide friend dilip reveals inside nd studio story
social share
google news

बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी स्वत:च्या हाताने बनवलेल्या एनडी स्टुडिओत (ND Studio) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 2 ऑगस्टला घडली होती. या घटनेने बॉलिवूड विश्वासाला मोठा धक्का बसला होता. नितीन देसाई यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे व कर्जदारांचे पैसे परत न करता आल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता कुटुंबियांच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरु आहे. दरम्यान नितीन देसाई आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यासोबत स्टुडिओत त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा (Dilip Pithwa) देखील उपस्थित होते. आता दिलीप पिठवा यांनी देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. (art director nitin desai commit suicide friend dilip pithwa reveals inside nd studio story)

ADVERTISEMENT

नितीन देसाई एनडी स्टुडिओत आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा देखील उपस्थित होते. या दिलीप पिठवा यांनी आता आत्महत्येपूर्वीची संपूर्ण कहाणी ई टाईम्सला सांगितली आहे. दिल्लीवरून प्रवास करून आम्ही स्टुडिओत पोहोचलो होतो. यावेळी नितीन देसाई यांनी आराम केल्यानंतर दुसऱ्या माळयावर जाऊन आत्महत्या केल्याचे दिलीप पिठवा यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Hari Narke Death : ‘दोन उलट्या झाल्या अन्…’; नरकेंचा मृत्यू कसा झाला?

आम्ही दिल्लीहून परतलो होतो आणि थेट स्टूडिओत गेलो होतो. यावेळी नितीन देसाई यांनी आराम करण्यासाठी अटेंडंटला बंगला उघडायला लावला, अशी माहिती दिलीप पिठवा यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, विश्रांती घेतल्यानंतर ते बाहेर आले आणि काही काम असल्याचं सांगून दुसऱ्या मजल्यावर गेले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे दिलीप पिठवा यांनी सांगितले. नितीन देसाई आर्थिक अडचणीत होते, त्यांनी त्यांचे पवईचे कार्यालय देखील विकल्याचे दिलीप पिठवा यांनी सांगितले.

हे वाचलं का?

दरम्यान दिलीप पिठवा नितीन देसाई यांचे चांगले मित्र तर आहेतच, त्यांनी एकत्र काम देखील केले आहे.जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुके सनम या सिनेमासाठी दोघांनी एकत्र काम केली होती.

नितीन देसाई यांच्या मुलीचे म्हणणे काय?

नितीन देसाई यांच्यावर 181 कोटी रूपयांचे कर्ज होते. त्यापैकी आम्ही 86.31 कोटी रूपये भरले होते. फेब्रुवारी 2020 पर्यंत आम्ही सर्व कर्जाचे हफ्ते भरले होते. तसेच कंपनीने नितीन देसाई यांच्याकडे 6 महिन्याचा इंटरेस्ट अॅडव्हान्स देखील मागितला होता. ही रक्कम वडिलांनी पवईचे ऑफिस विकून दिली होती. कोणाचीही फसवणूक करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता आणि त्यांनी घेतलेले सर्व पैसे ते परत करणार होते असे देखील मानसी देसाई यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून भयंकर हत्याकांड! तरुणाला बेदम मारलं अन् जिवंत असतानाच फेकलं विहिरीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT