Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना दणका! 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, विरोधात बोलणारेही रडारवर
अनेक बंडखोरांनी अर्ज अजूनही मागे घेतले नसून, अपक्ष फॉर्म कायम ठेवले आहेत. अर्ज मागे न घेणाऱ्या अनेक उमेदवारांवर कारवाईचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंविरोधाक वक्तव्य करणं भोवलं
अर्ज मागे घेऊनही पक्षाकडून हकालपट्टी
विधानसभेच्या तोंडावर बंडखोरांवर मोठी कारवाई
Uddhav Thackeray Shiv Sena : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आता बंडखोरांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. 4 नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, मात्र अनेक बंडखोरांनी अर्ज अजूनही मागे घेतले नसून, अपक्ष फॉर्म कायम ठेवले आहेत. अर्ज मागे न घेणाऱ्या अनेक उमेदवारांवर कारवाईचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले असून, आता अशा नेत्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया आणि विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याचं कारण देत माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये जागावाटापासाठी बैठका सुरू होत्या. अनेक जागांवर इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं, तसंच तिन्ही पक्षांमध्ये इच्छूक उमेदवार असल्यानं मोठा तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर अनेक मतदारसंघातील बंडखोरांची मनधरणी करण्यात नेतेमंडळींना यश आलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच नेत्यांनी अपक्ष भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावर पक्षाकडून हकालपट्टीची कारवाई केली जाते आहे. त्यानुसार वनी विधानसभेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, झरीचे तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मोरगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळचे प्रसाद ठाकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर रूपेश म्हात्रे यांनी भिवंडीतून अपक्ष उमेदवारी मागे घेतली, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
रुपेश म्हात्रे यांनी काय वक्तव्य केलं होतं?
हे ही वाचा >>Madhurimaraje : ज्यांनी माघार घेतल्यानं कोल्हापुरात राडा, त्या मधुरिमाराजे कोण? किती निवडणुका लढल्या? कारकीर्द कशी?
शिवसेनेचे माजी आमदार आणि बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना निर्वाणीचा इशारा दिला होता. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाईंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी समाजवादी पार्टीसोबत तडजोड केल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केला होता. भिवंडीतील शिवसैनिकांवर अन्याय करून सपाचे आमदार रईस शेख यांची वरळी आणि वांद्र्यात मदत घेत असल्याचा घणाघात रुपेश म्हात्रे यांनी केला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
"शिंदेंच्या मुलाला कल्याणमध्ये निवडून यावं म्हणून आपल्यावर कपिल पाटील सारखा उमेदवार लादला होता. तशीच वेळ आता आपल्यावर पुन्हा आली आहे. तिकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना रईस शेख मदत करेल म्हणून पुन्हा आपला बळी देण्याचं काम केलेलं आहे" असं म्हणत रुपेश म्हात्रे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT