Shahrukh Khan Birthday: सर्वात आश्चर्यकारक Video आला समोर, किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यासमोर घडलंय तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

shah rukh khan birthday news
Shahrukh Khan Mannat Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाहरुख खानच्या वाढदिवशीच धक्कादायक व्हिडीओ आला समोर

point

गेल्या कित्येक वर्षांच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं

point

मन्नत बंगल्यासमोरील व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Shahrukh Khan Birthday: सर्वात आश्चर्यकारक Video आला समोर, शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यासमोर घडलंय तरी काय?
शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि तमाम भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजेच शाहरुख खान. दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरून मुंबईच्या दिशेनं रवाना झाला अन् संपूर्ण सिनेविश्वात किंग बनलेला अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी भारतासह विविध देशातून चाहते शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळ 2 नोव्हेंबरला तळ ठोकून बसतात. कारण याच दिवशी शाहरुख खान हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा करतो. पण आज मन्नत जवळ असं काही घडलं, जे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

ADVERTISEMENT

दरवर्षी दिवाळीच्या उत्सवात म्हणजेच 2 नोव्हेंबरला शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बंगल्याजवळ दिग्गज कलाकारांसह चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, आज शाहरुखच्या वाढदिवशी मन्नत बंगल्याजवळ चाहत्यांची जराही गर्दी जमली नाहीय. वांद्रे येथील बँड स्टँडजवळ समुद्र किनारी असलेल्या शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळ रस्तेही सुन्न झाल्यासारखे पाहायला मिळाले.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम? खात्यात कधी येतील 1500?

कारण माध्यमकर्मींनी कॅमेरात कैद केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना विश्वासच बसला नाहीय. एरव्ही शेकडो चाहते मन्नत बंगल्याजवळ शाहरुखला पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं. पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचे फटके झेलूनही शाहरुखचे क्रेझी फॅन्स त्याला बर्थडे विश केल्याशिवाय राहत नाहीत. परंतु, मन्नतजवळील आजचा नजारा पाहून तुम्हीही चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही. 

हे ही वाचा >> Viral: आरारारा खतरनाक! 11 पोरं अन् घटस्फोटीत बायकांसाठी खरेदी केला कोट्यावधींचा बंगला, सर्वात श्रीमंत उद्योगपतीची कमाल

@goley.sunil या इन्स्टाग्राम यूजरने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, मी स्वप्नातही विचार केला नव्हता...तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच आश्चर्य व्यक्त कराल. कारण कोट्यावधींच्या संख्येत फॅन फॉलोईंग असणाऱ्या शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांनी अजिबात गर्दी केली नसल्याचं आज एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं.
 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT