Suhani Bhatnagar : 'दंगल' फेम अभिनेत्रीची धक्कादायक एक्झिट, अवघ्या 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
आमिर खानच्या दंगल चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत आलेली छोटी बबिता जिने बापू सेहत के लिए म्हणज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुहानी भटनागरच्या मृत्यूमुळे चित्रपसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात होऊन तिचा पाय मोडला होता, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
''दंगल' फेम सुहानी भटनागरचे निधन'
धक्कादायक सुहानी भाटनगरची धक्कादायक एक्झिट
दंगलमधील छोट्या बबिताचं धक्कादायक निधन
Dangal : काही दिवसापूर्वी आमिर खानच्या (Amir Khand) 'दंगल' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे कारण, त्या चित्रपटातील बालकलाकार सुहानी भटनागर (suhani bhatnagar) यांचे निधन (passed away) झाले आहे. सुहानीने 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने लोकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुहानी यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 'दंगल' चित्रपटात सुहानीने लहान बबिताची भूमिका साकारली होती. तिच्या निधनामुळे आता चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
पायाला गंभीर दुखापत
सुहाना भटनागरच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी सुहानीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचार सुरु करण्यात आल्यानंतर औषधांचे दुष्परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागले. औषधोपचारामुळे तिच्या शरीरात पाणी धरले होते. त्यामध्येच तिचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
एम्स रुग्णालयात उपचार
सुहानी भटनागर ही गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्या मृत्यू झाल्यानंतर मात्र तिच्या कुंटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Eknath Shinde: 'उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह आतापासून नव्हता तर...'
सुहानी जाहिरातींमधूनही झळकली
आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटात सुहानी भटनागर हिने छोटी बबिताची भूमिका केली होती. या चित्रपटात ती आमिर खान, साक्षी तन्वर आणि जायरा वसीमसोबत दिसली होती. तिच्या त्या भूमिकेनंतर तिचं कौतुकही झालं होतं. 'दंगल'नंतर सुहानी अनेक जाहिरातींमधूनही झळकली दिसली होती. मात्र त्यानंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून शिक्षणावर भर दिला होता.
आमिर खान प्रॉडक्शनला दुःख
दंगलमधील सुहानी भटनागरच्या निधनानंतर आमिर खान प्रॉडक्शनकडून एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सुहानीच्या मृत्यूमुळे प्रॉडक्शन हाऊसला धक्का बसल्याचेही सांगण्यात आले आहे. ती त्यांच्यासाठी स्टार होती आणि नेहमीच असेल असंही त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
असंख्य फॉलोअर्स
सुहानी भटनागर नोव्हेंबर 2021 पर्यंत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होती. इन्स्टाग्रामवर ती सातत्याने आपले फोटो शेअर करत होती, तर अनेक विनोदी व्हिडीओही ती शेअर करत होती. इन्स्टाग्रामवर तिचे असंख्य फॉलोअर्स होते. तिने दंगलमधील सहकाऱ्यांसोबतचेही अनेक फोटो आपल्या अकाऊंटवरून शेअर केले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> श्रीकांत शिंदेचा कंठ दाटला, CM शिंदेही झाले भावूक!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT