Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा कमबॅक करणार, पण बॉलिवूड नाही तर राजामौलींच्या चित्रपटातून...
दिग्गज दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी प्रियांका चोप्राला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केलं आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत काम करताना दिसणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियांका चोप्रा कमबॅक करणार?

एस. एस. राजामौलींच्या चित्रपटात येणार?
अभिनेत्री प्रियांका गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असल्याचं दिसतंय. प्रियांका चोप्रा 2019 मध्ये फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' हा चित्रपट प्रियांकाचा कमबॅक चित्रपट असल्याचं बोललं जात होतं, पण या चित्रपटाबाबत सध्या कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यातच आता रिपोर्ट्सनुसार, प्रियांका एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दिग्गज दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी प्रियांका चोप्राला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केलं आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत काम करताना दिसणार आहे. अजून, चित्रपटाचं नाव निश्चित झालं नसलं तरी, शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.
हे ही वाचा >> Sikandar Teaser : "बहुत लोग पीछे पडे़ हैं, बस मेरे...", धमक्या देणाऱ्यांना सलमानचं सिनेमातून उत्तर? सिकंदरमधील या डायलॉगची चर्चा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीपासून त्याचं शूटिंग सुरू होणार आहे. एस.एस. राजामौली अशा अभिनेत्रीच्या शोधात होते, जी फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध होईल. या भूमिकेसाठी प्रियांका यांच्यापेक्षा चांगला कोण असू शकतो? सूत्रांनुसार, दिग्दर्शक प्रियांकाला गेल्या 6 महिन्यांत अनेकदा भेटले आणि दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> ATS Action on Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरूवात, राज्यभरातून 16 जणांना अटक
एंटरटेन्मेंट पोर्टलच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा एस. एस. राजामौली सारख्या अनुभवी दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. महेश बाबूसोबत काम करणं हा सुद्धा अभिनेत्रीसाठी एक नवा अनुभव असणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा महेश बाबूसोबत अप्रतिम ॲक्शन करताना दिसणार आहे. हे एक अतिशय चांगले लिहिलेले पात्र आहे आणि प्रियांकानेही या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.