Arbaaz Khan-Shura Khan Lovestory : ‘लागलं सजनीला सजनाच याड’, अरबाज-शूरा कसे पडले प्रेमात?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Who Is Arbaaz Khan's Wife Shoora Khan how there unique love story started
Who Is Arbaaz Khan's Wife Shoora Khan how there unique love story started
social share
google news

Arbaaz Khan- Shoora Khan Lovestory : बॉलिवूडमधील (Bollywood) अशा अनेक लव्हस्टोरी ऐकल्या असतील ज्यांचा कधी विचारही केला नसेल. काही नाती बनतात तर काही बिघडतात. मॉडेल-अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अरबाज तिच्याशी लग्न करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र अचानक अरबाजने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ख्रिसमसच्या मुहूर्तावर अरबाजने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्याच्या पत्नीचे नाव शूरा खान आहे. (Who Is Arbaaz Khan’s Wife Shoora Khan how there unique love story started)

ADVERTISEMENT

अरबाजच्या शूरासोबतच्या रिलेशनबद्दल कोणालाच माहिती नव्हती पण अचानक बातमी आली की अरबाज २४ डिसेंबरला लग्न करणार आहे. अरबाजने बहीण अर्पिताच्या घरी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. अर्पिताच्या घरी एक एक करून अनेक पाहुणे येऊ लागले, तेव्हा या बातमीला दुजोरा मिळाला. रविवारी दुपारीच लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला होता. लग्नाला कुटुंब आणि अनेक पाहुणे हजर होते.

वाचा : Lok Sabha Opinion Poll 2024 : महाराष्ट्रात मविआ, उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजपचं काय?

अरबाजची पत्नी शूरा खान आहे तरी कोण?

शूरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. इंस्टाग्रामवर तिचे १३.२ हजार फॉलोअर्स आहेत. शूरा खान ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी रशा थडानी यांची मेकअप आर्टिस्ट आहे.

हे वाचलं का?

अरबाज-शूराची लव्हस्टोरी कशी झाली सुरू?

अरबाज खान आणि शुराची भेट अरबाज खानच्या आगामी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली. अरबाज खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाची कहाणी एका सामान्य महिलेच्या असामान्य लढ्याची असून ती पाटणा शहरावर आधारित आहे. यात रवीना टंडन, मानव विज, सतीश कौशिक आणि चंदन रॉय सन्याल यांच्या भूमिका आहेत. यावेळी चित्रपटाच्या सेटवर शूरा अरबाजची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शूरा खान सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही, ज्याचा अंदाज तुम्ही तिच्या खासगी इंस्टाग्राम अकाउंटवरून सहज लावू शकता.

वाचा : Shiv Sena : ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-पवारांवर टीकास्त्र, ‘खाल्ल्या ताटात घाण…’

अरबाजसोबत ब्रेकअपच्या चर्चेवर जॉर्जिया काय म्हणाली?

शूरासोबत अरबाजचे हे दुसरे लग्न आहे. अरबाज खानचे पहिले लग्न 1998 मध्ये मलायका अरोरासोबत झाले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान खान आहे. मलायकापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज खान बराच काळ जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता, पण त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली. पण एका मुलाखतीत जॉर्जियाने तिच्या ब्रेकअपबाबत खुलासा केला होता.

ADVERTISEMENT

वाचा : Opinion Poll 2024 Maharashtra : राऊतांनी सांगितलं ‘मविआ’चं लोकसभेचं टार्गेट

ती यावर म्हणाली होती की, “आम्ही मित्र होतो. आम्ही बेस्ट फ्रेंड्ससारखे होतो. माझ्या मनात त्याच्यासाठी फिलिंग्स होत्या आणि नेहमी असतील. आता कुणाची गर्लफ्रेंड म्हणून ओळखलं जातं हे मला खूप अपमानास्पद वाटतं. हे कायमचे राहणार नाही हे आम्हा दोघांना माहीत होते. हे खूप वेगळं होतं.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT