धमकी, रेकी, फायरिंग आणि मित्राची हत्या...लॉरेन बिश्नोईने सलमान खानला कसं केलं भयभीत? वाचा Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lawrence Bishnoi Threat To Salman Khan
Lawrence Bishnoi Threat To Salman Khan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लॉरेन बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान, काय आहे यामागचं कारण?

point

...म्हणून सलमान खानच्या घरावर लॉरेन बिश्नोई गँगने केला गोळीबार

point

लॉरने बिश्नोईची सलमान खानशी दुश्मनी काय?

Lawrence Bishnoi vs Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलंय. या पोस्टमध्ये स्पष्टपणे सलमान खानच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. सलमान खानला घाबरवण्यासाठी हा हत्याकांड केल्याचं बोललं जात आहे. लॉरेन्सच्या हिटलिस्टवर सलमान पहिल्या नंबरवर आहे. सहा महिन्यांपूर्वी लॉरेन बिश्नोई गँगने सलमानच्या घरावर फायरिंग केली होती. त्याआधाही सलमानला धमक्यांच्या चिठ्ठ्या पाठवण्यात आल्या होत्या. बिश्नोई गँग आता सलमानच्या जवळच्या व्यक्तींना निशाणा करत असल्याचं समोर आलं आहे. (Threats recce firing and now murder of friend how Lawrence Vishnoi created fear around Salman khan)

लॉरेन मागील सहा वर्षांपासून सलमान खानला धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. काळवीटचा शिकार केल्याप्रकरणी तो सलमान खानचा बदला घेणार आहे, असं 2018 मध्ये लॉरेनने म्हटलं होतं. त्याने सलमानवर हल्ला केला आहे. सलमानचे वडील सलीम खानलाही धमकी दिली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, ते सलमानचे खूप जवळचे मित्र होते. रविवारी सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबाचं सांत्वन केलं. 

हे ही वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट कुणी रचला? लॉरेन बिश्नोईने 9 दिवसांचा उपवास केला अन्..

लॉरेनने सलमानला भयभीत कसं केलं?

सलमानला भयभीत करण्यामागे बिश्नोई गँगचा काय उद्देश आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे. सलमान खानचा मित्र म्हणून बाब सिद्दीकी यांची हत्या केली? लॉरेन बिश्नोई गँगनेच बाबा सिद्दीकी यांची हत्या केली? की अंतर्गत वादविवादांमुळे त्यांची हत्या झाली? कारण कोणतही असो, या हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळासह बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.मुंबई पोलिसांना हे प्रकरण कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचं वाटत आहे. हत्येचा संशय लॉरेनच्या गँगवर आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून लॉरेन बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. या पोस्टमध्ये सलमान खानबाबत म्हटलं, जो सलमानचा दोस्त, तो आमचा दुश्मन. लॉरेनने साबरमती जेलमधून हत्येचा आदेश दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लॉरेन गँगमध्ये सामील आहे जीशना अख्तर?

बाबा सिद्दी हत्या प्रकरणात फरार झालेला आरोपी जीशान अख्तरबाबत मोठी अपडेट आली आहे. जीशान लॉरेनच्या गँगचं काम करतो, अशी सूत्रांची माहिती आहे. तो नेहमीच अमनोल बिश्नोईच्या संपर्कात होता. पंजाबमध्ये हत्या, लूटमारच्या प्रकरणात जीशानवर गुन्हे दाखल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यानंतर ती पोस्ट हटवण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सलमान खान या हत्येमागचं कारण आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार बोनस; थेट खात्यात जमा होतील 5500, फक्त...

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान

गेल्या अनेक वर्षामध्ये सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. लॉरेन बिश्नोई आणि भारत-कॅनडाचा वाँटेड गँगस्टर गोल्डी बरारने अनेकदा सलमान खानची हत्या करण्याची घोषणा केली होती. बिश्नोई आणि गोल्डी बरारने मुंबईत सलमानची हत्या करण्यासाठी शूटर पाठवले होते. लॉरेनचा खास गँगस्टर संपत मेहरा 2018 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करण्यासाठी आला होता. परंतु, हरियाणा पोलिसांन नेहराला आधीच अटक केली. त्याला रिमांडमध्ये घेतल्यानंतर सलमान खानच्या हत्येचा पूर्ण प्लॅनिंग त्याने सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT