Sunny Deol च्या बंगल्याचा नेमका वाद काय? लिलावाबाबत सर्व काही जाणून घ्या

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Sunny Deol's Bungalow Auction What exactly is the matter
Sunny Deol's Bungalow Auction What exactly is the matter
social share
google news

Sunny Deol’s Bungalow Auction : बॉलिवूड स्टार सनी देओल त्याच्या ‘गदर 2‘ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. प्रदर्शनाच्या 10 दिवसांनंतरही ‘गदर 2’ भारताच्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. त्याचबरोबर परदेशातूनही या चित्रपटाला प्रेम मिळत आहे. यामुळे सनीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र, त्याच्या चर्चेमागील हे एकमेव कारण नाहीये. सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव झाल्याची बातमीही चर्चेचा विषय ठरतेय. सनीच्या बंगल्याचा वाद काय आहे आणि त्याच्या संपत्ती संबंधित माहिती जाणून घेऊयात. (Sunny Deol’s Bungalow Auction What exactly is the matter)

ADVERTISEMENT

सनी देओलच्या या बंगल्याचे नाव सनी व्हिला आहे. इंडस्ट्रीत याला सनी सुपर साउंड या नावानेही ओळखलं जातं. सनी व्हिला जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, गोविंदा यांसारख्या स्टार्सचीही याठिकाणी घरं आहेत.

Chandrayaan 3 : पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे? जाणून घ्या 7 रंजक गोष्टी

धर्मेंद्र यांचा ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट 50 वर्षांपूर्वी सनी सुपर साउंडमध्ये तयार झाला होता. जुहूमधील सनी सुपर साउंड हे चित्रपट व्यक्तिमत्त्वांसाठी खासगी स्क्रीनिंगचे ठिकाण आहे. सर्व चित्रपटांचे स्क्रीनिंग येथे होते. यासोबतच त्यांचा या बंगल्यात स्वत:चा डबिंग स्टुडिओही आहे, जिथे बहुतांश चित्रपटांचे डबिंगही केले जाते. सनी व्हिला ही 5 मजली इमारत आहे. हे 600 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात तळघर, चित्रपटगृह, प्रॉडक्शन ऑफिस आणि टेरेस गार्डन आहे.

हे वाचलं का?

सनी व्हिलाच्या लिलावामागील वाद नेमका काय?

सनी देओलच्या बंगल्याच्या लिलाव प्रकरणी बँकेद्वारे जारी केलेल्या पहिल्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर 2022 मध्ये सनी देओलला सुमारे 56 कोटींचे कर्ज परत करायचे होते, ते परत करण्यात तो अपयशी ठरला. यामुळे बँकेने त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून 51 कोटी 43 लाख रुपयांपासून लिलाव सुरू होणार आहे. अशी माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.

Team India Squad Asia Cup 2023: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ 17 जणांना स्थान

हे कर्ज घेताना सनी देओलकडे आणखी दोन हमी आहेत, वडील धर्मेंद्र सिंग देओल आणि धाकटा भाऊ बॉबी देओल. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत आणि 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून लिलाव सुरू होईल, असे या जाहिरातीत म्हटलं होतं. अधिकृतपणे ही मालमत्ता 14 सप्टेंबर 2023 रोजी 11:00 पासून बँकेद्वारे अधिकृत केली जाईल, असंही पहिल्या जाहिरातीत लिहिलं होतं.

ADVERTISEMENT

सनी देओलचं यावर म्हणणं काय आहे?

सनी देओल सध्या त्याच्या ‘गदर 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लंडनमध्ये आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या टीमने सांगितले की, जी माहिती प्रसिद्ध झाली होती ती योग्य नव्हती, त्यामध्ये आता दुरुस्ती करण्यात आली आहे. 2 दिवसांनंतर सनी देओल भारतात परत येईल आणि यावर आपलं मत मांडेल.

ADVERTISEMENT

आता प्रकरण कुठे पोहोचलं?

बँक ऑफ बडोदाने रविवारी एका राष्ट्रीय वृत्तपत्रात सनी देओलच्या बंगल्याचा (सनी व्हिला) लिलाव करण्यासाठी जाहिरात दिली होती. मात्र २४ तासांत तो लिलाव पुढे ढकलण्यात आला. हा बंगला गहाण ठेवून सनी देओलने 2016 मध्ये बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. परंतु डिसेंबर २०२२ पासून त्या कर्जाचा ना हप्ता भरला गेला ना त्याचे व्याज दिले गेले.

Ratnagiri : बापरे! दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर 10 कोटींचे चरस कोठून आले?

यानंतर बँक ऑफ बडोदाने बंगल्याच्या लिलावासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. परंतु तांत्रिक कारण सांगून लिलाव पुढे ढकलण्याचं जाहिरातीत म्हटलं आहे. एनपीएचा नियम सांगतो की कर्जाचा हप्ता किंवा त्याचे व्याज 3 महिन्यांपर्यंत भरले नाही, तर लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचा लिलाव करण्याचा अधिकार वित्तीय संस्थेला आहे. हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते हे पाहावे लागेल.

सनी देओलचा गदर बॉक्स ऑफिसवर

सनी देओल व्यावसायिकदृष्ट्या खूप आनंदी आहे. त्याचा ‘गदर 2’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 8 दिवसांत 300 कोटींचा आकडा पार केला आहे. आता रिलीजच्या 10 दिवसांनंतर ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर 375 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे लवकरच 400 कोटींची कमाई होईल, अशी अपेक्षा आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT