Scam 2003 : ट्रेनमध्ये शेंगदाणे विकणारा ते सर्वात मोठा घोटाळेबाज, काय आहे कहाणी?
Scam चा नवा सीजन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जो स्टॅम्प पेपर घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगी याच्यावर आधारित आहे. जाणून घ्या नेमका कोण होता अब्दुल करमी तेलगी.
ADVERTISEMENT
Abdul Karim Telgi: ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ या हिट वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. या वेब सीरिजचे नाव ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ असे असेल. या फ्रँचायझीचा पहिला सीझन 1992 मधील भारतीय शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित होता, तर दुसरा सीझन 2003 मध्ये झालेल्या स्टॅम्प पेपर घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगीवर (Abdul Karim Telgi) आधारित असणार आहे. हर्ष मेहता या सीझनचेही दिग्दर्शन करणार आहे. (who is abdul karim telgi the biggest scammer who sold peanuts on the train what is the story scam 2033)
ADVERTISEMENT
वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे पूर्ण नाव ‘स्कॅम 2003: द क्यूरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असे आहे. ही एक हिंदी पुस्तकावर आधारित वेब सीरिज असणार आहे. पत्रकार संजय सिंह यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर्स डायरी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. संजय सिंह यांनीच या घोटाळ्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये ब्रेक केली होती.
कोण होता अब्दुल करीम तेलगी?
अब्दुल करीम तेलगी याच्यावर 2001 साली स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला होता. या घोटाळ्याच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. अब्दुल करीम तेलगीलाही याच वर्षी तुरुंगात जावे लागले होते. 2018 मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक सत्र न्यायालयाने अब्दुल करीम तेलगी आणि इतर सहा साथीदारांना या प्रकरणात आरोपी केले होते. सर्वांविरुद्ध ठोस पुरावे सापडले होते. मात्र, तेलगीचे 2017 मध्येच निधन झालं.
अब्दुल करीम तेलगी हा कर्नाटकातील खानापूर येथील रहिवासी होते. त्याचे वडील भारतीय रेल्वेत नोकरी करत होते. पण अब्दुल करीम तेलगी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर भाजीपाला, फळे, शेंगदाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याला करावा लागला होते. हे सर्व तो ट्रेनमध्येच विकायचा.
ADVERTISEMENT
तेलगीने स्थानिक सर्वोदय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर बीकॉमची पदवी घेण्यासाठी तो बेळगावातील एका महाविद्यालयात गेला. यानंतर तो उदरनिर्वाहासाठी मुंबईला आला. मुंबईत काही काळ घालवल्यानंतर अब्दुल करीम तेलगी सौदीला गेला. त्याला काही करून आयुष्यात जास्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची होती. काही वर्षांनी तो पुन्हा मुंबईत आला आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय फेस स्टॅम्प आणि स्टॅम्प पेपरचा होता.
ADVERTISEMENT
कशी केली या व्यवसायाची सुरुवात?
अब्दुल करीम तेलगी सौदीहून मुंबईला परतल्यावर तो पहिले ट्रॅव्हल एजंट बनला. ज्यानंतर त्याने स्वत:हूनच अनेक कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर बनवले, जेणेकरून तो सौदी अरेबियात लोकांना पाठवू शकेल. 1993 मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने अब्दुल करीम तेलगीच्या कृतींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी अब्दुल करीम तेलगी याला तुरुंगातही जावे लागले. त्याच्यावर फसवणुकीचा आरोप होता. यासाठी अब्दुल करीम तेलगीला दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अनेक रात्री काढाव्या लागल्या होत्या.
कोठडीत असताना अब्दुल करीम तेलगीची ओळख ही राम रतन सोनी याच्याशी झाली होती. तो एक सरकारी मुद्रांक विक्रेता होता जो कोलकाताचा होता आणि तो तेथून हे काम हाताळत असे. या घोटाळ्याची मोठी कल्पना तुरुंगातच दोघांमध्ये जन्माला आली. सोनीने अब्दुल करीम तेलगीला हे स्टॅम्प आणि नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर विकण्यास सांगितले, त्या बदल्यात त्याने कमिशनची मागणी केली. यानंतर स्टॅम्प पेपरचा घोटाळा सुरू झाला.
काय आहे स्टॅम्प पेपर घोटाळा?
सन 1994 मध्ये, राम रतन सोनीसोबत काम करत असताना, अब्दुल करीम तेलगी याने त्याचे उच्चस्तरीय लोकांशी असलेले संबंधांचा आधार घेतला आणि परवाना घेऊन कायदेशीर मुद्रांक विक्रेता बनला. अब्दुल करीम तेलगी आणि सोनी या दोघांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर तयार करून आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. अब्दुल करीम तेलगीने मूळ स्टॅम्प पेपर्स हे खोट्या पेपर्समध्ये मिसळण्यास सुरुवात केली. ज्यावर त्याने भरघोस नफा मिळवला. फेस स्टॅम्प व्यवसायातून त्याने भरपूर पैसे कमावले आणि स्वतःचे अनेक साइड बिझनेस सुरू केले.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: बारामतीत यु टर्न ते तेलगी प्रकरण, छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार
1995 मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि सोनी वेगळे झाले. यादरम्यान अब्दुल करीम तेलगी पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मुंबई पोलिसांनी अब्दुल करीम तेलगीविरुद्ध बनावट शिक्के विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आणि त्याचा परवाना रद्द करण्यात आलेला, पण अब्दुल करीम तेलगी त्याच्या कामात इतका निष्णात झाला होता की, त्यातून कसे बाहेर पडायचे हे त्याला चांगलेच माहीत होते.
सर्वात आधी तेलगीने स्वतःची प्रेस कंपनी काढली. सन 1996 मध्ये अब्दुल करीम तेलगीने आपल्या संपर्कातील शक्तिशाली लोकांना कामावर घेतले आणि मिंट रोड येथे स्वतःची प्रेस उघडली. त्याने आपले संबंध वापरून अनेक मशीन्स खरेदी केल्या. ही सर्व यंत्रे जुन्या पद्धतीची होती. हळूहळू त्यांचा व्यवसाय इतर शहरांमध्येही पसरू लागला. अनेकांनी बनावट स्टॅम्प, स्टॅम्प पेपर खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या स्टॅम्प पेपरचा चुकीच्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करण्यासाठीही वापर करण्यात आला. विम्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. 90 च्या दशकात अब्दुल करीम तेलगीचा बिझनेस कोट्यवधी रुपयांचा झाला.
अटक आणि मृत्यू कसा झाला?
2001 मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलिसांनी अटक केली होती. 2000 साली बंगळुरूमध्ये बनावट स्टॅम्प पेपर विकताना पकडलेल्या दोन लोकांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला होता. ज्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी अब्दुल करीम तेलगीच्या देशभरात 36 मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. तसेच त्याचे 18 देशांमध्ये 100 हून अधिक बँक खाती उघडला होती.
2003 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही अब्दुल करीम तेलगीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा घोटाळा 20 हजार कोटींचा होता, ज्याने संपूर्ण देश हादरला होता. 2006 मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या इतर साथीदारांना 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या सर्वांना 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण अब्दुल करीम तेलगी याचे 2017 साली अनेक अवयव निकामी झाल्याने निधन झाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT