Wrong UPI MoneyTransfer : गुगल पे, फोन पेद्वारे चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर काय करायचं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

UPI Wrong Payment Transaction : UPI सुरू झाल्यापासून भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेव्हा पैसे ट्रान्सफर करणे किंवा पेमेंट करण्याची वेळ येते तेव्हा बरेच लोक त्याचा वापर करतात. पैसे घेणे किंवा पाठवणे हे यूपीआयमुळे सोपं काम झालं आहे. UPI च्या माध्यमातून मोबाईलवरून कोणालाही काही सेकंदातच पैसे ट्रान्सफर करता येतात. या सुविधेमुळे त्याचा वापरही झपाट्याने वाढला आहे. (How to Recover Money Transferred in wrong Account by UPI)

पण, काहीवेळा असं होतं की, UPI ट्रान्झॅक्शन करताना तुमच्याकडून चुकीच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, मग अशा वेळी तुम्ही काय कराल? यासाठी काही सोप्या पद्धती आहेत ज्यांचा तुम्हाला पैसे परत मिळवण्यास फायदा होईल. UPI ट्रान्झॅक्शन ही एक अतिशय जलद प्रक्रिया आहे आणि एकदा पैसे प्रोसेस झाल्‍यानंतर तुम्‍ही ते रिव्‍हर्स करू शकत नाही. तसंच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या समस्येवर तोडगा म्हणून ” UPI ऑटो-रिव्हर्सल” सिस्टम लागू केली आहे. यावरून तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची रिक्वेस्ट करू शकतात.

India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!

चुकून झालेलं ट्रान्झॅक्शन कसं करता येणार रिव्हर्स?

जेव्हा UPI ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही कोणत्या विशिष्ट अटींनुसार ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची रिक्वेस्ट करू शकता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम, तुम्ही चुकीच्या UPI आयडी किंवा मोबाईल नंबरवर पैसे पाठवले असल्यास, तुम्ही ते परत करण्याची रिक्वेस्ट करू शकता. दुसरं म्हणजे, जेव्हा एखादं न केलेलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला अकाउंटमध्ये दिसल्यास, तत्काळ तुमच्या बँक किंवा UPI सर्व्हिस प्रोव्हायडरला त्याची तक्रार करणं महत्त्वाचं आहे. नंतर, तुम्ही केवळ त्या UPI ट्रान्झॅक्शनला रिव्हर्स करू शकता जे पेंडिंग आहे किंवा अयशस्वी झाले आहे. यशस्वी ट्रान्झॅक्शनला रिव्हर्स करता येत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ट्रान्झॅक्शन करण्यापूर्वी डिटेल्स तपासा

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, एकदा ट्रान्झॅक्शन यशस्वी झालं की ते परत करता येत नाही. त्यामुळे, कोणत्याही चुका टाळण्यासाठी UPI व्यवहार करण्यापूर्वी डिटेल्स नीट तपासा. लक्षात ठेवा की UPI वापरताना, ट्रान्झॅक्शनच्या नोंदी ठेवा, सतर्क राहा तुमचा UPI पिन सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्राप्तकर्त्याचे डिटेल्स दोनदा तपासा.

Yashomati Thakur : ‘तू चोट्टा, तुझी बायको चोट्टी’ त्या आरोपावर यशोमती ठाकुर राणांवर भडकल्या

‘या’ स्टेप्स करा फॉलो

  • तुम्ही कोणतेही UPI ट्रान्झॅक्शन केलं असेल जे तुम्हाला रिव्हर्स करायचे असेल, तर पहिली स्टेप म्हणजे तुमच्या बँक किंवा UPI सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहक सहायतेशी संपर्क साधा. व्यवहार संदर्भ क्रमांक, तारीख आणि रक्कम यासह सर्व डिटेल्स द्या. ते तुम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्यात मदत करू शकतात. UPI ट्रान्झॅक्शन समस्यांची त्वरित तक्रार करणं महत्त्वाचं आहे. काही बँका आणि UPI सर्व्हिस प्रोव्हायडर अशा सिक्वेस्टसाठी वेळ आणि अटी देतात.
  • जर ट्रान्झॅक्शन रिव्हर्सल अटींची पूर्तता करत असेल आणि तुमची बँक किंवा UPI सर्विहस प्रोव्हायडरने मंजूरी दिली, तर ते UPI ऑटो-रिव्हर्सल प्रक्रिया सुरू करतील. विशिष्ट प्रोव्हायडर आणि त्यांच्या धोरणांच्या आधारावर यास काही वेळ लागू शकतो.
  • UPI ऑटो-रिव्हर्सल प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमच्या बँक किंवा UPI सर्व्हिस प्रोव्हायडरकडून कन्फर्मेशन मिळेल. रिव्हर्सल यशस्वी झाल्यास, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत जमा होतील.

Ganpat Gaikwad : शिवसेना-भाजपत ठिणगी, थेट एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदेंवर आरोप

जर पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये पाठवले गेले असतील तर…

जर तुमच्याकडून चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले असतील, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागेल (फोन-पे, Google पे, पेटीएम). जिथे तुम्हाला काही डिटेल्स विचारले जातील. यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवावी लागेल. मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेत चुकीच्या पेमेंटची तक्रार करावी लागेल.

ADVERTISEMENT

हेल्पलाइन नंबर

  • फोन-पे हेल्पलाइन नंबर- 1800-419-0157
  • Google-Pay हेल्पलाइन नंबर- 080-68727374 / 022-68727374
  • पेटीएम हेल्पलाइन नंबर- 0120-4456-456
  • BHIM हेल्पलाइन नंबर- 1042047-1042074

    follow whatsapp

    ADVERTISEMENT