Diwali 2024 calendar: वसुबारस ते भाऊबीज...तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

diwali 2024 when in dhanteras choti diwali bhai dooj diwali padwa date timing and muhurt
यंदा दिवाळी कधी आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिवाळी कधी सुरू होणार?

point

किती दिवस आहे दिवाळी?

point

'या' तारखेला दिवाळीला होणार सुरूवात

Diwali 2024 Calendar : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सूरू आहे. बाजारपेठा चमचमत्या लाईटींगने सजल्या आहेत. तर रांगोळ्याच्या रंगाचाही ढीग नजरेस पडतोय. अशात आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की दिवाळी कधी आहे. खरं तर 28 ऑक्टोबरला वसुबारस आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत ही दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवसात, कोणत्या दिवशी नेमकं काय आहे? आणि त्याचा मुहूर्त काय असणार आहे. हे जाणून घेऊयात. (diwali 2024 when in dhanteras choti diwali bhai dooj diwali padwa date timing and muhurt) 

28 ऑक्टोबरला वसुबारस 

यंदाच्या वर्षी वसुबारस हे 28 ऑक्टोबरला आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक वेळचे जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे श्लोक म्हणून सुर्यास्तानंतर पूजा करतात. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करतात. तेही शक्य नसल्यास गायीच्या चित्राची पूजा करतात. 

'या' दिवशी धनत्रयोदशी

यंदा 29  ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. याशिवाय या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादींची खरेदी करणे शुभ मानले जात कारण या दिवशी झोपणे आणि कोणतीही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तसेच, या दिवशी देवांचा वैध स्वामी धन्वंतरीचा जन्म झाला. यामुळेच या दिवशी धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते. जर तुम्हीही धनत्रयोदशीच्या खास मुहूर्तावर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ जाणून घ्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धनत्रयोदशी तिथीची सुरुवात: 29 ऑक्टोबर, सकाळी 10.32 पासून

हे ही वाचा : Rangoli Designs for Diwali 2024 : दिवाळीत झटपट दारात काढाल 'या' रांगोळ्या, वेळेचेही होईल बचत!

नरक चतुर्दशी 2024 तिथी आणि योग्य वेळ

ज्योतिषांच्या माहितीनुसार, यंदा छोट्या दिवाळीचा उत्सव 30 ऑक्टोबर 2024 ला साजरा केला जाणार आहे. नरक चतुर्दशीची सुरुवात 30 ऑक्टोबरला दुपारी 1.16 वाजता होणार आहे. तर पुढच्या दिवशी 31 ऑक्टोबरला दुपारी 3.35 वाजता याचा समारोप होणार आहे. हा उत्सव सायंकाळी साजरा केला जातो. त्यामुळे यमाचा दिवा 30 ऑक्टोबरला लावणे शुभ ठरेल. नरक चतुर्दशीला सूर्यास्तानंतर प्रदोष काळात यमाचा दिवा पेटवला पाहिजे. दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मृत्यूचं भय राहत नाही. तसच प्रार्थना केली जाते की, यमदेव नरकाचे दरवाजे बंद करा. आमचं आरोग्य चांगलं ठेवा. या दिवशी यमराजाचीही पूजा केली जाते आणि घरात दिवे लावले जातात. 

ADVERTISEMENT

'या' दिवशी लक्ष्मी पूजन

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

ADVERTISEMENT

जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणिधनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥अशी कुबेराची प्रार्थना करावी. 

या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात

.लक्ष्मीपूजन मुहूर्त (1 नोव्हेंबर 2024, शुक्रवार)दु. 3 ते 5.15, सायं. 6 ते 8.30, रात्री 9.10 ते 10.45 

हे ही वाचा : Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? बलिप्रतिपदाचे महत्व आणि कथा वाचा

दिवाळी पाडवा कधी आहे? 

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024  शनिवार) पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50

'या' तारखेला भाऊबीज

यंदा 3 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज (Bhaubeej) सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT