Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! 'या' दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100?

मुंबई तक

ladki Bahin Yojana Next Installment: भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारे महिला सशक्तीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरु करतात.

ADVERTISEMENT

तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरण झाला
तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरण झाला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ladki Bahin Yojana Next Installment: भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारे महिला सशक्तीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरु करतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक सहाय्य दिलं जातं. सरकारकडून ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिल्यांच्या खात्यात जमा केली जाते. 

सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत. महिलांना आता योजनेच्या पुढच्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार? असा सवाल सोशल मीडियावर उफस्थित केला जात आहे.

कधी मिळणार योजनेचा पुढचा हफ्ता?

राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पाच हफ्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. सरकारकडून चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे दिवाळीआधी एकत्रितपणे देण्यात आले होते. तेव्हा लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात 3000 रुपये देण्यात आले होते. आता महिलांना सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता दिला जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हे ही वाचा >>  8 December 2024 Gold Rate : ग्राहकांनो! पटापट सोनं खरेदी करा; लग्नसराईत सोन्याच्या भावात मोठी घसरण

'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल. 

हे ही वाचा >> Eknath Shinde : "...तेव्हा ईव्हीएम घोटाळा", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा

हे वाचलं का?

    follow whatsapp