Cholesterol : कोलेस्ट्रॉल करु शकतं तुमचा घात, 'हे' खाद्यपदार्थ खाणं आजच थांबवा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं?

point

कोलेस्ट्रॉलमुळे कोणते धोके?

point

कोणत्या सवयी ठरतील धोकादायक?

Cholesterol : आपल्या शरीराच्या प्रक्रियेसाठी कोलेस्टेरॉल खूप महत्वाचं आहे. पण ते योग्य पातळीत असलेलं बरं, कारण शरिरात जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवी, तर ते शरिरासाठी विशेषतः हृदयासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल म्हणजे सोप्या भाषेत एक प्रकारचा चरबी असते. ही चरबी वाढल्यानं शरिरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. खराब किंवा अति कोलेस्ट्रॉल वाढल्यानं स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, टाइप 2 चा मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातसारख्या गोष्टीही या एका गोष्टीमुळे होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली नाही, तर शरिरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोणते पदार्थ खालल्यानं कोलेस्ट्रॉलचा धोका वाढू शकतो हे जाणून घेऊ.  

 


पॅकेजमधील खाद्यपदार्थ

 

बाजारात उपलब्ध असलेलं पॅकबंद खाद्यपदार्थ खाण्याचा ट्रेंड सध्या सर्रास सुरू आहे. मात्र हे खाद्यपदार्थ शरिरासाठी धोकादायक असतात. या खाद्यपदार्थांवर लवकर खराब होऊ नये म्हणून विशिष्ट प्रक्रिया केलेली असते. अशा पदार्थांमध्यें ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे असे अन्नपदार्थ खाणंही टाळा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 


गोड पदार्थ

 

गोड पदार्थ शरिरासाठी खूप हानिकारक असतात. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं खराब कोलेस्टेरॉल वाढू लागतं, ज्यामुळे पुढे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्ही रोज केक, कुकीज, शेक आणि मिठाई खात असाल तर आजच ही सवय बंद करा किंवा नियंत्रणात आणा.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

धूम्रपान

 

धूम्रपान हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे तुम्ही ऐकलंच असेल, पण तुम्हाला हे माहिी आहे का की, यामुळे शरिरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे जर तुम्हाला आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सिगारेट ओढणं पूर्णपणे बंद करा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT