Kitchen Tips : साखरेच्या डब्ब्यात मुंग्यांचा सुळसुळाट? फक्त या ट्रिक्स वाचा, एकही मुंगी दिसणार नाही

मुंबई तक

How To Separate Ants From Sugar : दिवाळीचा सण उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. दिवाळीत गोड फराळ बनवण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

ADVERTISEMENT

How To Keep Ants Away From Sugar, ants remedy
Natural Ways to Get Rid of Sugar Ants
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साखरेच्या डब्ब्यात झालेल्या मुंग्या झटपट पळून जातील, फक्त...

point

साखरेच्या डब्ब्यात अजिबात मुंग्या फिरणार नाहीत, काय कराल?

point

या आहेत सोप्या किचन टीप्स

How To Separate Ants From Sugar : दिवाळीचा सण उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. दिवाळीत गोड फराळ बनवण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण किचनमध्ये डब्ब्यात ठेवलेल्या साखरेत मुंग्या फिरत असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. कधी कधी तर या मुंग्या संपूर्ण साखरेच्या डब्ब्यावर तुटून पडतात. त्यामुळे खराब झालेली साखर बाहेर फेकून द्यावी लागते. तुम्हालाही किचनमध्ये अशाप्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असले, तर आम्ही सांगितलेल्या या जबरदस्त ट्रिक्सचा एकदा वापर करून बघा. साखरेच्या डब्ब्याजवळ एकही मुंगी फिरणार नाही. 


ट्रिक नंबर 1 - योग्य कंटेनर निवडा

सर्वात आधी साखर स्टोअर करण्यासाठी योग्य कंटेनर (डब्बा) निवडा. तुम्ही स्टील किंवा ग्लासच्या कंटेनरमध्ये साखरेला स्टोअर करू शकता. साखरेच्या डब्ब्याचं झाकण फिट झालंय की नाही, याची काळजी घ्या.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट

ट्रिक नंबर 2 - लवंग

साखरेच्या डब्ब्याचं झाकण गच्च असतानाही मुंग्या आत शिरल्या, तर त्या डब्ब्यात थोडं लवंग टाका. त्यानंतर मुंग्या डब्ब्यातून बाहेर निघतील. लवंगच्या वासाने मुंग्या पळून जातील.

ट्रिक नंबर 3 - लसूण

लसणाच्या काही पाकळ्या साखरेच्या डब्ब्याजवळ ठेवा. यामुळे डब्ब्यात मुंग्या शिरणार नाहीत. तसच तुम्ही लसूण कुटून पाण्यात उकळून घ्या. या पाण्याला थंड करून एका स्प्रे बॉटेलमध्ये भरा. त्यानंतर हा स्प्रे साखरेच्या डब्ब्यावर मारा. लसणाच्या वासानेही मुंग्या पळून जातील.

हे ही वाचा >> Optical Illusion Test: फोटोत हत्ती दिसतोय? पण तो हत्ती नाही, क्लिक करून नीट बघा

ट्रिक नंबर 4 - व्हिनेगार

एका कपड्यावर व्हिनेगार शिंपडून साखरेच्या डब्ब्याखाली ठेवू शकता. व्हिनेगारच्या वासामुळेही मुंग्या पळून जातात.

हे वाचलं का?

    follow whatsapp