PAN 2.0 : नव्या जमन्याचं नवं पॅनकार्ड, QR कोडचा काय उपयोग होणार? घरबसल्या कसा कराल अर्ज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नव्या पॅन कार्डचा काय असणार फायदा?

point

पॅन कार्डवरील QR कोडचा उपयोग काय?

point

जुनं पॅन कार्ड बंद होणार?

प्रत्येकापर्यंत पॅन कार्ड आणि त्यासंबंधीत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पॅन कार्डची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पॅन 2.0 हा प्रकल्प सुरू केला आहे. नवीन पॅन कार्डला आता QR कोडही असणार आहे. या माध्यमातून कार्ड स्कॅन करून सर्व माहिती मिळवू शकणार आहात. QR कोड प्रणालीमुळे तुम्हाला अनेक महत्त्वाची कामं करणं सोपं होणार आहे. पॅन 2.0 प्रकल्पासाठी सरकारला अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

नवीन पॅन कार्ड आणण्याचं महत्वाचं कारण भारताला डिजिटल पद्धतीने सक्षम करणे आणि आयकर विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणणे. PAN 2.0 उपक्रम हा एक ई-गव्हर्नन्स अंतर्गत असलेला एक प्रकल्प असून, करदात्यांच्या नोंदणीकृत सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणं हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. तसंच, पॅन आणि TAN प्रणाली एका नोंदणीकृत प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करून या प्रकल्पाच्या माध्यमातून डेटा सुरक्षित करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ChatGPT वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय इंजिनीअरचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, कारण काय?
 

PAN 2.0 शी संबंधित तुमच्या मनातले प्रश्न

1. प्रश्न- जुनं पॅन कार्ड अवैध होईल का?
उत्तर- नाही, जुन्या पॅनकार्डवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण पॅन कार्डधारकांची इच्छा असल्यास ते या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतात. ही पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया असणार आहे. अर्ज केल्यानंतर काही वेळानंतर तुमच्या नोंदणीकृत ई-मेलवर माहिती पाठवली जाते.

2. प्रश्न- नवीन पॅनकार्ड कुठे मिळेल?
उत्तर- जर तुम्हाला क्यूआर कोड असलेलं पॅन कार्ड बनवायचं असेल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. हे पॅन तुमच्या मेलवर पाठवलं जाईल किंवा तुम्ही तो NSDL वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

ADVERTISEMENT

3. प्रश्न- नव्या पॅनसाठी शुल्क किती असणार?
उत्तर- ही सेवा पॅन 2.0 जाहीर झाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांच्या आत अर्ज करणाऱ्यांसाठी विनामुल्य असणार आहे. त्यानंतरच्या अर्जकर्त्यांना जीएसटीसह 10 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जातील. तसंच, जर तुम्हाला फिजिकल पॅन हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

ADVERTISEMENT

अर्ज कसा करायचा?

हे ही वाचा >> CM Revanth Reddy on Allu Arjun : "अल्लू अर्जून गाडीवर उभं राहून...", अल्लू अर्जूनच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
 

  • PAN 2.0 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. 
  • NSDL द्वारे ई-पॅनसाठी www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या वेबसाईटला ला भेट द्या.
  • त्यानंतर तुमचे पॅन, आधार कार्ड तपशील आणि जन्मतारीख तिथे टाका.
  • तुम्ही भरलेली माहिती तपासा आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळवण्यासाठी पुढे जाल. 
  • ओटीपी टाकल्यानंतर शुल्क भरण्याचा पर्याय येईल. 
  • पेमेंट झाल्यानंतर, ई-पॅन तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ३० मिनिटांच्या आत पाठवलं जाईल. फिजिकल पॅनसाठी
  • तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल.
  • तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर पॅन न मिळाल्यास, कृपया पेमेंट तपशीलांसह tininfo@proteantech.in वर संपर्क साधा.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT