Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? आकडा एकूण दिवाळी दणक्यात कराल साजरी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana fourth installment date declare and how much amount will deposite on bank account mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde
चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चौथ्या हप्त्याची तारीख ठरली

point

महिलांच्या खात्यात किती पैसेे येणार

point

सरकारकडून तारीख आणि पैसे जाहीर

Mukhymantri Ladki Bahin Yojana, Fourth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर आता सरकारने चौथ्या हप्त्याची घोषणा केली आहे. हा चौथा हप्ता नेमका कधी मिळणार आहे? आणि या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana fourth installment date declare and how much amount will deposite on bank account mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde)
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Salil Ankola : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह, पुण्यात काय घडलं?

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 

किती पैसे येणार? 

ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे.  ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही, कारण...

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT