जन्मदात्या आईनंच जुळ्या मुलांना टाकीत फेकलं, नंतर स्वत:... धक्कादायक घटनेनं पुणे जिल्हा हादरला
मंगळवारी सकाळी 6:30 वाजता महिलेनं आपल्या जुळ्या बाळांसह घराच्या गच्चीवर जाऊन बाळांना पाण्याच्या टाकीत टाकलं. त्यानंतर महिलेने स्वत: सुद्धा टाकीत उडी घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जन्मदात्या आईनेच जुळ्या मुलांना टाकीत फेकलं

मुलांना पाण्यात टाकल्यावर स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

पुण्यातील थेऊर गावात नेमकं काय घडलं?
Pune News : पुण्यात काल एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थेऊर ग्रामपंचायतीमधील दत्तनगर हद्दीत एका महिलेनंच आपल्या दोन जुळ्या बाळांचा जीव घेतला. या महिलेनं बाळांना थेट पाण्याच्या टाकीत टाकून दिलं. ही घटना एवढ्यावरच संपत नाही. तर बाळांना फेकणाऱ्या महिलेनं नंतर स्वत: सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून, महिलेला वाचवण्यात यश आले आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा >> "माझ्या भावाला सोडा, काही करू नका...", धनंजय देशमुखांनी कुणाला फोन केले? जबाबात समोर आलं
महिला आपल्या जुळ्या बाळांना घेऊन आपल्या आईच्या घरी थेऊरमध्ये राहायला आली होती. तिची बाळं जन्मापासूनच वारंवार आजारी पडत होती. यामुळे ती तणावात आणि नैराश्यात होती. घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी ही माहिती दिली.
मंगळवारी सकाळी 6:30 वाजता महिलेनं आपल्या जुळ्या बाळांसह घराच्या गच्चीवर जाऊन बाळांना पाण्याच्या टाकीत टाकलं. त्यानंतर महिलेने स्वत: सुद्धा टाकीत उडी घेतली. टाकीचं तोंड लहान असल्यानं आणि पाणी कमी असल्यानं ती पूर्णपणे बुडाली नाही. तिचं डोके दोन-तीन वेळा टाकीच्या बाहेर आलं. हे सगळं शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या घराच्या गच्चीवरून पाहिलं. त्यानंतर या व्यक्तिने ही माहिती तात्काळ तिच्या घरी दिली.
हे ही वाचा >> 'मुलांना जन्म.. करुणासोबत लग्नासारखे संबंध, पोटगी द्यायची!' धनंजय मुंडेंना दणका, कोर्टाचा निकाल जसाच्या तसा..
महिलेच्या कुटुंबीयांनी गच्चीवर जाऊन पाहिलं, तेव्हा दोन्ही बाळं पाण्यात बुडालेली होती.स्थानिकांनी आणि कुटुंबातल्या लोकांनी मिळून बाळांना वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाळांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.
दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार महेश कारे, दिगंबर जगताप, विशाल बनकर, पोलिस अमलदार मंगेश नानापुरे, भारती होले, अश्विनी पवार, हरीहर, निकिता पोल, रूपाली कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ दाखल देऊन तपास सुरू केला. महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे.