Ladki Bahin Yojana : फक्त 'याच' 'महिलांच्या खात्यात 4500 डिपॉझिट, यादीत तुमचं नाव आहे का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme third installment deposite women account is your name on this list
4500 खात्यात झाले डिपॉझिट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' महिलांच्या खात्यात 4500 जमा

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

point

तुमच्या अर्जाच काय झालं?

Mukhymantri ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500  रूपये जमा होत आहेत. तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही आहेत. अशात आता लाडकी बहीण योजनेची एक यादी समोर आली आहे. या यादीत जर तुमचं नाव असेल, तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही खालील पद्धतीने तुमचं नाव यादीत आहे की नाही? हे तपासू शकता. (ladki bahin yojana scheme third installment deposite women account is your name on this list) 

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.   

हे ही वाचा : Aditya Thackeray : ''मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधळलाय, तोच गुलाल...'',ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मोठं आव्हान

ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अॅर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. जर तरीही यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारणा करता येणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी नक्की तपासा.

'या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ 

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचे अर्ज मंजूर, पण बँकेत किती पैसे येणार?

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT