Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme women get benefit of third installment but how much money deposited into the account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता किती तारखेला येणार?

point

तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार?

point

'त्या' महिलांना 1500 मिळणार?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता (Third Installment) महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात (Women Account) हा तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. पण या तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme women get benefit of third installment but how much money deposited into the account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar) 

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते. 

थेट 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?

किती तारखेला पैसे येणार? 

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. 

'या' महिलांना फक्त 1500 मिळणार? 

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करणार आहेत, त्या महिन्यापासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नुसता फॉर्म भरून पैसे मिळणार नाही, 'या' गोष्टी खूप महत्वाच्या!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT