Ladki Bahin Yojana : बँक खात्यात 4500 जमाच झाले नाही! महिलांनो, कुठे कराल तक्रार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ladki bahin yojana third installment not deposited in bank account women where do complaint know the details
महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात

point

पण महिलांच्या खात्यात पैसेच आले नाही

point

महिलांनी आता पुढे काय करायचं?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात (Women Bank Account) तिसरा हप्ता (Third Installement) जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे. पण अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे, हे पैसे नेमके येणार तरी कधी आहेत? त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील, तर नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana third installment not deposited in bank account women where do complaint know the details) 

गुरूवार 19 सप्टेंबरपासून तिसरा हप्त्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतल, अशी चर्चा सूरू होती. त्यानुसार महिला देखील बँक खाते तपासायला सुरूवात केली होती. मात्र अनेक महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नाही आहे. ज्या महिलांचे अर्ज जुलैमध्ये मंजूर झाले होते. त्या महिलांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचे एकत्रित मिळून 3000 रूपये आले होते.आता या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या 1500 रूपयाची अपेक्षा होती. पण महिलांच्या खात्यात पैसैच आले नाहीयेत. त्यामुळे जर तुम्हालाही पैसे आले नसतील, तर तुम्हाला हा क्रमांक डायल करून त्याची चौकशी करता येणार आहे. 

हे ही वाचा :  ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम वाढणार, फक्त...

'महाराष्ट्रवादी' व्हॉट्सॲप हेल्पलाईन 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रवादी' व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु केली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या नंबरवर समस्या कशा सांगायच्या? 

वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.
तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा.
 ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा. 
योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा. 
समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा. 
यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल.

 महिलांना तक्रार करता येणार? 

माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत अॅपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच  त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : ...तर 4500 हातातून गमावून बसाल, 'ही' चूक आताच टाळा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT