Maza Ladka Bhau Yojana Apply: लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!

मुंबई तक

ADVERTISEMENT

लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!
लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडका भाऊ योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

point

समजून घ्या अर्ज भरण्याची सोप्पी पद्धत

point

माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज ऑनलाईनही भरता येणार?

Maza Ladka Bhau Yojana 2024: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण या योजनेनंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही नवी योजना सुरू केली आहे. जी आता माझा लाडका भाऊ या नावाने ओळखली जात आहे. या योजनेमध्ये तरुणांना दरमहा तब्बल 10,000 रुपये दिले जाणार आहेत. तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. (maza ladka bhau yojana 2024 get rs 10000 per month know the process of filling the form how to apply)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने एकापाठोपाठ एक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे माझी लाडकी बहीण या योजनेनंतर माझा लाडका भाऊ योजना देखील सुरू करण्यात आली आहे. पण यासाठी नेमका अर्ज कसा भरायचा याबाबत आम्ही आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत.

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Ladka Bhau Yojana Maharashtra 2024) ही योजना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि आर्थिक मदतही  दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना 6000 ते 10,000 रुपयांपर्यंत पैसे मिळणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याशिवाय प्रशिक्षणादरम्यान पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्यही देण्यात येणार आहे, जेणेकरून युवक व विद्यार्थ्यांना रोजगार मिळून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करता येईल. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. 

Maharashtra Maza Ladka Bhau Yojana 2024: नेमकी योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी शासनाने नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेत, ‘माझा लाडका भाऊ योजना’ (Maza Ladka Bhau Yojana 2024 ) मध्ये सामील होऊन प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना दरमहा 10,000 रुपयापर्यंतची मदत दिली जाईल. तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला वर्ग करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana Documents : 'ही' पाच कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील आणि 10,000 रुपयांच्या आर्थिक सहाय्याने त्यांचा अभ्यासही सुरू ठेवता येईल. सरकारकडून प्रशिक्षणादरम्यान दिलेली आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ देणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही योजना राज्यातील तरुणांना स्वावलंबी आणि सशक्त बनविण्यास मदत करेल आणि त्यांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम करेल. ‘लाडका भाऊ योजने’द्वारे कौशल्य प्रशिक्षण घेऊन तरुणांना कुठेही नोकरी मिळू शकेल किंवा त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल.

Maza Ladka Bhau Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा?

जर तुम्ही महाराष्ट्रातील तरुण नागरिक असाल आणि लाडका भाऊ योजना 2024 चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून सहजपणे अर्ज करू शकता.

ऑनलाइन नोंदणी

  • सर्वप्रथम तुम्हाला लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (जी अद्याप उपलब्ध नाही).
  • वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
  • यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी लागतील.
  • शेवटी, तुम्हाला सब्मिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे, तुमची लाडका भाऊ योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाइन अर्ज

  • लाडका भाऊ योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
  • सगळ्यात आधी Ladka Bhau Yojana Maharashtra च्या अधिकृत पेजला भेट द्या.
  • वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा.
  • डाउनलोड केलेला फॉर्म प्रिंट करा आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • फॉर्म भरल्यानंतर त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करून फॉर्म सब्मिट करा.
  • या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT