सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून! पतीला म्हणाली, तुम्ही 20 वर्षांपासून मला...
Aligarh News: उत्तर प्रदेशातील अलीगड येथे सर्वांनाच चकित करुन टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आपल्या होणाऱ्या जावयाला घेऊन पळून गेली आहे. सासू आणि जावयाची ही प्रेमकहानीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जावयासोबत पळून गेली सासू

सासू-जावयाचं प्रेम कसं झालं?

पळून गेलेली सासू नवऱ्याला काय म्हणाली?
Aligarh News : उत्तर प्रदेशातील अलीगड येथे सर्वांनाच चकित करुन टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आपल्या होणाऱ्या जावयाला घेऊन पळून गेली आहे. सासू आणि जावयाच्या या प्रेमकहानीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. कुणालाच काहीही कळू न देता महिलेने होणाऱ्या जावयासोबत पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. महिलेचे पती जितेंद्र कुमार यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. यानंतर पोलीस त्या महिला आणि तिच्या होणाऱ्या जावयाच्या शोधात आहेत.
नेमकं काय घडलं?
हे ही वाचा >> सोळाव्या वर्षी आश्रमात भेट, प्रेम, लग्न ते कोर्ट... करूणा मुंडेंनी सांगितलं 'ते' कधीपासून बिघडले
जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. जितेंद्र यांच्या पत्नीने लग्नाची पत्रिका घेऊन त्यांना त्यांच्या मेव्हणीच्या घरी पाठवले. जितेंद्र हे बंगळुरू येथे नोकरी करत असून ते गावी खूपच कमी वेळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी माझ्या मेव्हणीला पत्रिका देऊन घरी परतल्यानंतर माझी बायको घरी नव्हती. कोणा नातेवाईकांकडे गेली असेल असं मला वाटलं. मात्र, तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे मला संशय आला".
कॉल डिटेल्स वरुन झालं उघड
आपल्या पत्नीच्या शोधात असताना जितेंद्र यांनी महिलेचे कॉल डिटेल्स चेक केले. यावरुन त्यांची पत्नी आपल्या होणाऱ्या जावयाशी दिवसभरात 15 तासांहून अधिक वेळ बोलत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या प्रकारानंतर जितेंद्र यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाला कॉल केला. जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा होणारा जावई त्यांना फोनवर म्हणाला, "तुमची तुमच्या पत्नीला 20 वर्ष त्रास दिला, आता त्यांना विसरुन जा." यावरुन जितेंद्र यांचा संशय पक्का झाला कारण त्यांच्या जावई त्याच्या होणाऱ्या पत्नीशी कमी आणि त्याच्या सासूशीच जास्त वेळ फोनवर बोलत असायचा.
सासू घेऊन गेली लाखो रुपये
हे ही वाचा >> ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच पगार, MSRTC मध्ये नेमकं काय घडतंय, नेमकं प्रकरण काय?
जितेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पत्नी घरातून 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेली. या सगळ्या घटनेवर त्यांची मुलगी शिवानी म्हणाली, "ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं, त्याच्यासोबतच माझी आई पळून गेली. आईने आम्हाला सगळ्यांनाच धोका दिला." तसेच, आई मेलीये किंवा जिवंत आहे, याचा त्यांना काहीच फरक पडत नसल्याचं शिवानीने सांगितलं. आम्हाला आमचे पैसे आणि दागिने परत हवे असल्याचंसुद्धा शिवानी म्हणाली.
पोलिसांनी सुरु केला तपास
पोलीस सुद्धा या घटनेचा अगदी गांभीर्याने तपास करत आहेत. या घटनेतील आरोपी महिला आणि युवकाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. विश्वासघात, फसवणूक आणि चोरी अशा बाबी या केसमध्ये दिसून आल्या आहेत. केसचा तपास करण्यासाठी कौटुंबिक बाबींचा विचार करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
परिसरात बनला चर्चेचा विषय
ही विचित्र आणि आश्चर्यचकित घटना अलीगडमध्ये चर्चेचा विषयय बनला आहे. सासू आणि जावयामधील या नात्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. लवकरात लवकर त्या दोघांचा शोध घेणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. अद्याप, या घटनेसंबंधी संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.