Mazi Ladki Bahin Yojana: बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये, फक्त...

मुंबई तक

ADVERTISEMENT

 बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये
बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणार 1500

point

माझी लाडकी बहीण योजनेत बँक खातं नसेल तरी मिळणार महिलांना पैसे

point

पाहा महिलांना नेमके कोणत्या खात्यात सरकार देणार पैसे

Mazi Ladki Bahin Yojana post bank account: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता 3000 रूपये जमा होत आहेत. पण या योजनेतील पैसे मिळण्यासाठी बँकेत खातं असणं आवश्यक आहे असा अनेकांचा कयास आहे. त्यामुळे सध्या बँकांसमोर बरीच गर्दी पाहायला मिळते आहे. मात्र, कोणत्याही बँकेत खातं नसेल तरी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळू शकतील. ते नेमकं कसं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (mazi ladki bahin yojana even if you dont have a bank account you can get rs 1500 only need to have a post bank account)

माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी बँकेत खातं असणं आवश्यक? 

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बुधवार 14 ऑगस्टपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत. 

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट महिलांच्या बँक खात्यात येणार आहे. त्यामुळे बँकेचं खातं ही गोष्ट या योजनेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ज्याप्रमाणे अर्ज पात्र ठरण्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज आहे. त्या प्रमाणेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: 1500 रु. जमा पण झाले, तुम्ही कसली पाहताय वाट? 'असा' भरा अर्ज...

आतापर्यंत अनेक महिला या बँकेत खातं नसल्याने माझी लाडकी बहीण योजनेसाठी ते अर्ज भरू शकलेले नाहीत. पण आता खासगी किंवा सार्वजनिक बँकेत खातं नसेल तरीही महिलांना 1500 रुपये हे मिळू शकतात. 

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 12 जुलै 2024 रोजी एक जीआर जारी केला होता. ज्यामध्ये, हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, 'सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे.' 

ADVERTISEMENT

याचाच अर्थ महिलांचे कोणत्याही बँकेत खाते नसले पण त्यांचे पोस्टात बँक खाते असेल तर ते ग्राह्य धरले जाईल आणि त्यामध्येच सरकारकडून दरमहा 1500 रुपये हे जमा केले जातील.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रातील 10 Tick आहेत तरी काय?

पोस्ट हे बचतीसाठी सर्वात सोपा आणि विश्वासार्ह समजलं जातं. त्यामुळे अनेक महिला या पोस्टातच खातं सुरू करतात आणि त्यामध्येच पैसे जमा करतात. आता हेच पोस्ट खातं माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावं असा शासन निर्णय जारी करण्यात आल्याने त्याचा लाखो महिलांना फायदा होणार आहे. 

या निर्णयामुळे महिलांना नव्याने एखाद्या बँकेत खातं सुरू करण्याची गरज भासणार नाही.

माझी लाडकी बहीण योजना: पात्रता अटी

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे. पात्रतेसाठी, महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, कुटुंबाकडे 3 किंवा 4 चाकी वाहन नसावे. अर्ज करताना आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अचूक अपलोड करावी, तरच अर्ज स्वीकारला जाईल.

माझी लाडकी बहीण योजना: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्ज क्रमांक
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते क्रमांक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT