Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! अपात्र महिलांना पैसे परत द्यावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

ऋत्विक भालेकर

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 26 जानेवारीच्या आधी 1500 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली होती.

ADVERTISEMENT

 लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे परत द्यावे लागणार?

point

लाडकी बहीण योजनेतील त्रुटी शोधण्यासाठी...

point

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

Ladki Bahin Yojana Updates :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 26 जानेवारीच्या आधी 1500 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली होती. परंतु, यो योजनेत अपात्र ठरलेल्या ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत, त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. याच पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 

आदिती तटकरे माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाल्या?

"माझी लाडकी बहीण(Ladki Bahin Yojana) योजनेसंदर्भात एकही लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. ज्या महिला अपात्र आहेत त्या स्वेच्छेने योजनांचा लाभ सोडतायत. अशा साडेचार हजार महिला असतील. प्रत्येक योजनांची वर्षभरात स्क्रुटिनी होते. माझी लाडकी बहीण त्याला अपवाद नाही. योजनांमधल्या त्रुटी शोधण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. त्यामानानं आमची योजना नवीन आहे त्यामुळे अशा त्रुटी समोर येतील तशी दुरूस्ती होत राहील, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना दिलीय. 

हे ही वाचा >> Saif Ali Khan meets Auto Driver : अर्ध्या रात्री मदतीला धावून आलेल्या रिक्षा चालकाला सैफची झप्पी, फोटो समोर

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री वादावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, "आम्ही तीन पक्षांच्या नेतृत्वात काम केलं. प्रत्येक पक्षानं एकमेकांना मदत केलीय. महायुतीचं नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पालकमंत्रीपदाची मागणी करणं यात काही वावगं नाही. पण ती कशा पद्धतीनं करावी हा मुद्दा आहे. आपल्याच सरकारविरोधात आंदोलनं करणं, माझी संस्कृती नाही. माध्यमांपेक्षा मी आमच्या पक्षश्रेष्टींकडे भूमिका मांडेन. मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. ते आल्यावर यावर तोडगा काढतील.

हे ही वाचा >> Krishna Andhale Wanted : कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांनी जाहीर केलं प्रसिद्धी पत्रक

घराणेशाहीचा आरोप करणं अयोग्य कारण लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. तसेच इतर जिल्हे जसे सातारा, कोल्हापूर याठिकाणी आमच्या पक्षाचे आणि भाजपचे आमदार मंत्री यांची संख्या अधिक असतांना शिवसेनेला पालकमंत्रिपद दिलंय. म्हणून आम्ही काही आंदोलनं केली नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी काही विचार करूनच हे निर्णय घेतले असावेत, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp