डेबिट कार्डची लागणार नाही गरज, UPI द्वारेच ATM मधून काढता येणार पैसे!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

No need for debit card Now money can be withdrawn from ATM by UPI
No need for debit card Now money can be withdrawn from ATM by UPI
social share
google news

UPI ATM Transaction : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे देशातील सर्वात वेगाने वाढणारी पेमेंट सिस्टम आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग 50% पेक्षा जास्त आहे. भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणल्यानंतर आता देशातील पहिले UPI ATM सुरू करण्यात आले आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेसने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने व्हाईट लेबल एटीएम (WLA) च्या स्वरूपात देशातलं पहिलं UPI-ATM सादर केलं आहे. याद्वारे तुम्ही डेबिट कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढू शकाल. (No need for debit card Now money can be withdrawn from ATM by UPI)

ADVERTISEMENT

UPI ATM फक्त ‘या’ डिव्हाइसवरच करणार काम!

हे UPI यूजर्ससाठी उपलब्ध आहे ज्यांच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर UPI अॅप इंस्टॉल आहे. याद्वारे QR-आधारित UPI रोख काढण्याची सुविधा उपलब्ध होईल. ही संकल्पना दुर्गम भागातील लोकांना त्वरित रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी आणली आहे. यासाठी डेबिट कार्डची गरज नसून व्यवहार सहज करता येतात. ज्या भागात कार्डचा प्रवेश मर्यादित आहे तेथे बँकिंग सेवांचा सहज प्रवेश करून आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन मिळेल.

Maratha Reservation : जीआर निघाला! मनोज जरांगे पाटलांना जे नको होतं, तेच झालं!

ट्रांजॅक्शन करण्याची पद्धत काय?

UPI ATM मधून पैसे काढणे खूप सोपे आहे. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला एटीएममधून काढायची असलेली रक्कम निवडावी लागेल. यानंतर निवडलेल्या रकमेसाठी एक QR कोड दिसेल. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर उपलब्ध असलेले कोणतेही UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करावे लागेल. यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी UPI पिन टाकावा लागेल. यानंतर एटीएममधून सहज पैसे काढता येतील. UPI-ATM द्वारे पैसे काढणे सोपे आणि सुरक्षित आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Viral Story: शरीरात अर्धा लिटर विष… तब्बल 5000 इंजेक्शन देऊन वाचवला शेतकऱ्याचा जीव!

बँकांद्वारे ऑफर केलेल्या कार्डलेस व्यवहारांपेक्षा ते वेगळे कसे असेल?

सध्या, कार्डलेस व्यवहार मोबाइल नंबर आणि OTP वर अवलंबून आहेत, परंतु UPI-ATM हे QR स्कॅनिंगवर आधारित आहे. UPI-ATM हे UPI यूजर्ससाठी सोयीस्कर आहे ज्यांच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर UPI अॅप्लिकेशन इन्स्टॉल आहे. व्यवहार करण्यासाठी, यूजर्सनी त्यांच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर UPI अॅप्लिकेशन इन्स्टॉल करणं आवश्यक आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT