Amit Thackeray : उपकारांची परतफेड करावी अशी... अमित ठाकरे महायुतीबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यंदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं दिसतंय. नुकतीच मनसेने आता (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतून मनसेने 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलंय.

ADVERTISEMENT

अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात
अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात

point

विधानसभा मतदारसंघासाठी खास व्हिजन

point

महायुतीबद्दल काय म्हणाले अमित ठाकरे?

Amit Thackeray Mahim Assembly मुंबई : राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे दादर माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर विधानसभा निवडणुकीत उतरणारे अमित हे दुसरे ठाकरेपूत्र आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे. या निवडणुकीबद्दल बोलत असताना अमित ठाकरे यांनी ही निवडणूक आपण पूर्णपणे स्वबळावर लढणार आहे असं म्हटलं आहे. 

अमित ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्याविरोधात सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, साहेबांना मी स्वत: सांगितलं की माझ्यासाठी जागांची तडजोड करू नका. तसंच शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता, त्याबद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे ठाम भूमिका घेतात. ती उपकाराची भावना नसते. राज साहेबांनी काही उमेदवारांसाठी सभा घेतल्या, पण त्यांनी परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही असं अमित ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा >>Ajit Pawar Candidates List : अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर, नेमक्या कोणत्या जागा मिळाल्या?

 

विधानसभेची निवडणूक ही लढाई आहे, मी एकटा निवडणुकीत उतरून काही होणार नाही असंही अमित ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्यावर राजसाहेबांचे संस्कार आहेत, त्यामुळे वरळीत काय होतं, समोरचे काय भूमिका घेतात याबद्दलचा विचार करत नाही असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. आपण साहेबांकडे कुठल्याही मतदारसंघाची मागणी केली नव्हती असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

हे ही वाचा >>Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?

 

दादर-माहिमच्या जनतेचे प्रश्न मला तोंडपाठ आहेत. निसर्गाने दिलेला समुद्रकिनारा साफ करुन लोकांना दाखवायचाय असं म्हणत अमित ठाकरे यांनी आपलं व्हिजनही स्पष्ट केलं. फक्त माहिम आणि दादरसाठी नाही तर आपले दरवाजे हे महाराष्ट्रासाठी खुले आहेत, पण मतदारसंघातील जनतेसाठी काही दिवस ठरवणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp