Ravindra Waikar : वायकरांच्या निकालाविरोधात ठाकरेंनी थोपटले दंड, सगळा प्लॅन आला समोर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

anil parab on mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi
निकालानंतरच्या 10 दिवसात मोबाईल बदलला गेल्याचा आरोपा अनिल परब यांनी केला आहे.
social share
google news

Anil Parab On Ravindra Waikar Result : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील मतमोजणीवर मोठा वाद पेटला आहे. या वादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी (Vandana Suryavanshi) यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. या खुलास्यानंतर आज ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन निकालाच्या प्रक्रियेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निकालानंतरच्या 10 दिवसात मोबाईल बदलला गेल्याचा आरोपा अनिल परब (Anil Parab) यांनी केला आहे. इतकचं नाही तर निवडणुकीच्या प्रक्रियेला हरताळ फासलं गेलं, 19 व्या फेरीनंतर निवडणुकीच्या प्रक्रिया डावलली गेल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. (anil parab on mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे, अमोल कीर्तिकर आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या मतमोजणी केंद्रावर निवडणुकीच्या प्रक्रियेला हरताळ फासलं गेला आहे. 19 व्या फेरीनंतर निवडणुकीच्या प्रक्रिया डावलली गेली. निकाल जवळ येत असताना निकालाची पारदर्शकता गेल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. 

हे ही वाचा : Mumbai North west Lok sabha : "वायकरांच्या निकालात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात"

एका विधानसभेला 14 टेबल असतात, या 14 टेबलानंतर एक एआरओचा टेबल असतो. या टेबलकडे एका पक्षाचा प्रतिनिधी असतो. या टेबलावर उमेदवारांची मतांची बेरीज केली जाते आणि मग ती आरओकडे जाते. यावेळेस एक वेगळीच पद्धत होती.  एआरओचा टेबल आणि प्रतिनिधी यामध्ये इतकं अंतर ठेवण्यात आलं होतं की,  एआरओ कुठला आकडा पाठवत होते ते शेवटपर्यंत कुणालाच कळू शकले नाही. 19 व्या फेरीनंतर राऊंड कळत होती.एआरओच्या टेबलमध्ये आणि आमच्यामध्ये अंतर होतं त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. कारण आमच्या आणि त्यांच्यात अंतर होतं, असे अनिल परब यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्याची घटना ही 4 जूनला घडली आणि गुन्हा 16 जूनला दाखल झाला. त्यामुळे या 10 दिवसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या दरम्यान मोबाईल बदलला गेल्याचा संशय अनिल परब यांनी व्यक्त केला. 

सुर्यवंशीने सांगितलं आम्ही एआरओला प्राधिकृत केलं होतं मोबाईल वापरायला, पण तिकडे त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता. पण यात कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही.  आम्ही पण असिस्टंट एआरओला विचारलं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे याचे उत्तर नाही आहे. कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्रे नाहीयेत,असे अनिल परब यांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Recruitment 2024: भरघोस पगार अन् सरकारी नोकरी; BAMU मध्ये मेगा भरती!

तसेच इनकोरला डेटा अपडेट करण्यासाठी ओटीपी येतो. या ओटीपीवरून डेटा अपडेट करतो. हा फोन ज्यावेळेस सुरेंद्र अरोरा आणि शाह यांनी ऑब्जेक्शन घेतला, त्याच्यानंतर तो फोन बाहेर पाठवला गेला. जर हा फोन बाहेर पाठवला त्यानंतर ज्या फेऱ्या झाल्या त्या त्यांनी कोणत्या फोनवरून अपडेट केल्या? यासाठी कुठला फोन वापरला? आणि कुणाचा फोन वापरला? याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला द्यावी, अशी मागणी अनिल परब यांनी यावेळी केली. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT