Maharashtra Politics : 'माझी लाडकी बहीण' महायुतीला तारणार? समजून घ्या राजकीय अर्थ

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची शिंदे सरकारने घोषणा केली.
social share
google news

Mahayuti News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागाच जिंकता आल्या. 2014 आणि 2019 महायुतीने 41 जागा जिंकल्या होत्या. आता तीन पक्ष, केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. जबर फटका बसल्यानंतर महायुतीने आता महत्त्वाच्या व्होटबँकेकडे लक्ष वळवलं आहे. त्याची झलक अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा होत आहे. त्यामुळे तिचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्त्वाचे आहे. 

अजित पवारांनी शुक्रवारी (28 जून) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला. यात महत्त्वाची आणि चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय?

अजित पवारांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना सरकारकडून दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी सरकारने 46 हजार कोटी रुपयांचा निधीही प्रस्तावित केला आहे. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल? त्याचे निकष काय असतील? याबद्दल आता सरकारकडून माहिती प्रसिद्ध केली जाईल. पण, या योजनेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होईल का, हा विषय महत्त्वाचा आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात महिला मतदार निवडणूक निकालात निर्णायक

अलिकडेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामुळे महायुती खडबडून जागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांतील मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न आता सरकारकडून अंतिम टप्प्यात केले जाताना दिसत आहे. यात महिलाही आहेत. आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत होईल का याबद्दल आताच कुणीही मांडताना दिसत नाही.

हेही वाचा >> पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होणार? 

आता महाराष्ट्रातील महिला मतदार का महत्त्वाच्या आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील महिला मतदारांची संख्या बघा... महाराष्ट्रात 2.63 कोटी महिला मतदार आहेत. यातील 4.46 कोटी महिला मतदारानीच लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. 

ADVERTISEMENT

महिला मतदारांची संख्या आता विधानसभा निवडणुकीत वाढेल. प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांची संख्या मोठी आहे. महिला मतदार ज्या आघाडीला आपल्या बाजूने वळवण्यात यश येईल, त्यांना विधानसभेत चांगले यश मिळू शकते. त्यामुळेच महायुतीकडून महिला व्होटबँकला खूश करण्याचा प्रयत्न आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आधी जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा मोठा फायदा भाजपला मध्य प्रदेशात झाला. भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेच. पण, लोकसभा निवडणुकीतही भाजपने सगळ्या जागा जिंकल्या. यात महिला मतदारच निर्णायक ठरल्याचे विश्लेषण आणि आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळेच महायुतीने तशाच पद्धतीने योजना आणली आहे.

हेही वाचा >> अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय झालं महाग? पाहा संपूर्ण लिस्ट 

महायुती सरकारने यापूर्वी महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. त्याचे परिणाम म्हणावे तसे लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्यामुळे माझी लाडकी बहीण योजना किती राजकीय लाभ महायुतीला मिळवून देते हे बघावे लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT