Maharashtra Budget 2024 : ''भाजपाच्या लाडक्या भावाने स्वत:च्या लाडक्या बहिणीला...'', शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra budget 2024 jitendra awhad criticize ajit pawar ladki bahin yojna
maharashtra budget 2024, jitendra awhad, ,ajit pawar, ladki bahin yojna,
social share
google news

Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेची घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली होती. या योजनेवरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली आहे. (maharashtra budget 2024 jitendra awhad criticize ajit pawar ladki bahin yojna) 

जितेंद्र आव्हाड टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. पण गेले 4 महिने स्वत:च्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.

हे ही वाचा :  Maharashtra Budget 2024 : 'मत'पेरणी! शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या 'या' मोठ्या घोषणा

तसेच हा अर्थसंकल्प हा फसवा आहे. कारण त्यांनी स्वत: अर्थंसंकल्पात लिहलंय, मुल्यमापन आणि सुसूत्रिकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत. म्हणजे मुल्यमापन न करता, सुसूत्रिकरण न करता हा अर्थसंकल्प आणला आहे. आता जे काय करायचं आहे ते ती समिती करेल, असे उत्तर द्यायला ते मोकळे होतील, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकी लाडकी बहीण योजना काय? 

महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हे ही वाचा :  शिंदे सरकारच्या 'या' घोषणांची चर्चा, बजेटमध्ये काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT