Pankaja Munde : पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होणार? भाजपमध्ये काय सुरूये खलबतं?

मुंबई तक

Pankaja Munde News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपकडून पक्षातंर्गत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसत असून, पंकजा मुंडे यांना ताकद देण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू आहेत.

ADVERTISEMENT

भाजप नेत्या पंकजा मुंडे.
पंकजा मुंडे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंकजा मुंडे राजकारणातील महत्त्वाचा ओबीसी चेहरा

point

पंकजा मुंडे यांना पुढे आणण्याचे भाजपकडून प्रयत्न

point

भाजप पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेणार?

Pankaja Munde News : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना महाराष्ट्रात प्रचंड फटका बसला आहे. सर्वाधिक फटका भाजपला मराठवाड्यात बसला असून, पक्षाकडून आता पंकजा मुंडेंना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता एक रिपोर्ट समोर आला असून, पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने भाजप नेत्याच्या हवाल्याने दिले आहे. 

ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे या गेली पाच वर्ष पक्षातून बाजूला पडल्या होत्या.  राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपकडून लोकसभेला त्यांना संधी देण्यात आली होती. पण, त्यांचा पराभव झाला. 

पंकजा मुंडे विधान परिषदेत जाणार?

सूत्रांच्या माहितीनुसार बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना पक्ष विधान परिषदेत पाठवण्याच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा >> ''पंकजा मुंडेंना धोका दिला'', शिंदेंच्या नेत्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ 

भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, "देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्य कोअर कमिटीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत पाठवून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस केली आहे."

"भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही याला समंती दिली आहे", असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >> 'प्रज्ञा सातव अडचणीत? ठाकरेंच्या खासदाराचे थेट काँग्रेसच्या महासचिवांना पत्र 

भाजपमध्ये कार्यरत असलेल्या एका नेत्याने सांगितले की, "पक्षाकडे दोन पर्याय होते. पहिला म्हणजे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणे आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री घेणे. दुसरा पर्याय असा की पंकजा मुंडेंना विधान परिषद आमदार करणे आणि महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करणे."

मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा

मराठवाड्यात लोकसभेच्या आठ, तर विधानसभेच्या 46 जागा आहेत. आठ पैकी एकच जागा महायुतीला जिंकता आली. जालना आणि बीड या दोन जागा सातत्याने भाजपकडे राहिल्या. पण, वेळी या दोन्ही जागाही भाजपला यावेळी गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर नांदेड, लातूर हे लोकसभा मतदारसंघही गमवावे लागले आहेत.

हेही वाचा >> पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट? 

मागील दोन निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळाले होते. लोकसभेत अपेक्षाभंग झाल्याने भाजपने आता सामाजिक समीकरणांवरही लक्ष्य केंद्रीत केले आहे. मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी हे दोन्ही घटक महत्त्वाचे असून, भाजपकडून ओबीसी चेहऱ्याला ताकद देण्याचे प्रयत्न आता होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp