BJP 3rd Candidate List : राम सातपुते, सुरेश धस यांना संधी; भाजपच्या शेवटच्या यादीत कुणाकुणाचा नंबर लागला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

महायुतीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
महायुतीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपकडून तिसरी यादी जाहीर

point

भाजपकडून आतापर्यंत 146 उमेदवारांची यादी जाहीर

point

तिसऱ्या यादीत कोणकोणत्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळाली?

BJP Candidate List मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत जागा वाटपाचा मुद्दा सर्वात जास्त गाजला. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरुन अनेक दिवस रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर आता जागावाटपाचा मुद्दा जवळजवळ संपला असला तरी, अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे. त्यातच आता भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये आता कुणाकुणाला संधी मिळाली हे पाहणं महत्वाचं आहे. (BJP Third List Declare with 25 candidates amid vidhan sabha election 2024)

ADVERTISEMENT

महायुतीने आतापर्यंत आपल्या 235 जागा जाहीर केल्या होत्या. यामध्ये भाजपने आपल्या 121 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता काहीवेळापूर्वच भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने आता पुन्हा आपल्या 121 जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने पुन्हा 25 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं भाजपचा आकडा 146 पर्यंत गेला आहे. उमेदवारी मिळणार की नाही अशी धाकधूक असलेल्या राम सातपुते, सुरेश धस, भारती लव्हेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

 

हे वाचलं का?

भाजपच्या 25 जणांची तिसरी यादी 

 

हे ही वाचा >>Madha Vidhan Sabha : माढा विधानसभेतून मनोज जरांगे यांचा शिलेदार मैदानात, लढणार की माघार घेणार? काय म्हणाले ऐका...

 

  1. मुर्तिजापूर : हरीश पिंपळे
  2. कारंजा : सई डहाके 
  3. तिवसा : राजेश वानखडे
  4. मोर्शी : उमेश यावलकर
  5. आर्वी : सुमित वानखेडे
  6. काटोल : चरणसिंह ठाकूर
  7. सावनेर : आशिष देशमुख 
  8. नागपूर मध्य : प्रवीण दटके 
  9. नागपूर पश्चिम : सुधाकर कोहळे
  10. नागपूर उत्तर : मिलिंद माने
  11. साकोली : अविनाश ब्राम्हणकर
  12. चंद्रपूर : किशोर जोरगेवार 
  13. आर्णी : राजू तोडसाम
  14. उमरखेड : किशन वाखेडे 
  15. देगलुर : जितेश अंतापूरकर
  16. डहाणू : विनोद मेढा 
  17. वसई : स्नेहा डुबे 
  18. बोरिवली : संजय उपाध्याय
  19. वर्सोवा : भारती लव्हेकर
  20. घाटकोपर : पराग शाह 
  21. आष्टी : सुरेश धस 
  22. लातूर : अर्चना चाकुरकर
  23. माळशिरस : राम सातपुते 
  24. कराड उत्तर : मनोज घोरपडे
  25. पळुस कडेगाव : संग्राम देशमुख

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT