Chembur Vidhan Sabha Election 2024: ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं, चेंबूर विधानसभेची जागा कशी राखणार?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

चेंबूर विधानसभेची जागा ठाकरेंचा शिलेदार कशी राखणार?
चेंबूर विधानसभेची जागा ठाकरेंचा शिलेदार कशी राखणार?
social share
google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Chembur Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. मात्र, असं असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांची चिंता वाढू शकते. अशाच काही मतदारसंघांपैकी एक म्हणजे चेंबूर विधानसभा मतदारसंघ. येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चेंबूरमध्ये कोण बाजी मारणार याकडे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिवसेना (UBT) पक्षाचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर हे त्यांच्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवू शकतात का? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यावर यामध्ये असलेल्या चेंबूर विधानसभा  मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला नेमकं कोण बाजी मारु शकतं याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.

हे ही वाचा>> आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा, वरळीची जागा धोक्यात?

मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे  उमेदवार अनिल देसाई  सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. पण या निकालामुळे प्रकाश फातर्पेकर यांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवत राहुल शेवाळे यांची खासदारकीची हॅटट्रिक चुकवली.  

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात प्रकाश फातर्पेकर यांचा चेंबूर हा मतदारसंघ देखील येतो. जिथे शिवसेना (UBT)खासदार अनिल देसाई यांना केवळ 2858 असं निसटतं मताधिक्य मिळालं आहे. यामुळेच प्रकाश फातर्पेकरांची डोकेदुखी वाढली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> नवाब मलिक जिंकणार की हरणार?, 'त्या' निर्णयावर सारं अवलंबून!

शिवसेनेत फूट पडल्यापासून जे आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले त्यामध्ये प्रकाश फातर्पेकर यांचाही समावेश आहे. मात्र, असं असलं तरी विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी नक्कची सहज-सोप्पी नसेल. कारण त्यांच्या मतदारसंघात अनिल देसाई यांनी अगदीच कमी मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाने अधिक ताकद लावली तर त्याचा फटका फातर्पेकरांना बसण्याची दाट शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

प्रकाश फातर्पेकर यांच्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

  • अनिल देसाई (शिवसेना - UBT) - 61 हजार 335  मतं मिळाली
  • राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट) - 58 हजार 477 मतं मिळाली

2019 विधानसभा निवडणुकीत चेंबूरमध्ये कोणाला किती मतं मिळालेली?

2019 विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातर्पेकर यांना चेंबूर विधानसभा मतदारसंघात 53 हजार 264 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना यांना 34 हजार 246 मतं मिळाली होती. याशिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यांचे उमेदवार राजेंद्र माहुलकर यांना तब्बल 23,178 मतं मिळालेली.. तर या मतदारसंघात मनसे ही चौथ्या क्रमांकावर होती. त्यांचे उमेदवार कर्ण डुंबाळे यांना 14,404 मतं मिळाली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT