CM Devendra Fadnavis : Ladki Bahin, गोवंश हत्याबंदी ते विरोधकांची संख्या...फडणवीसांच्या पहिल्या प्रेसमधले 10 मुद्दे

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सही कोणत्या फाईलवर केली?

point

गोवंश हत्याबंदीबद्दलच्या कायद्याबद्दल काय म्हणाले फडणवीस?

राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन झालं असून, देवेंद्र फडणवीस   हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. तसंच एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे तातडीनं मंत्रालयात रवाना झाले. यावेळी आपल्या औपचारिकता पूर्ण करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री म्हणून 'मुख्यमत्री आरोग्य सेवेच्या कक्षात' एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी 5 लाख रुपये देण्याबद्दलच्या फाईलवर सही केली. तसंच यावेळी त्यांनी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार ते विधानसभा अध्यक्षनिवडीपर्यंतच्या सर्व प्रश्नांची  उत्तरं दिली. 

ADVERTISEMENT


CM फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे :

 

हे ही वाचा >> Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : फडणवीसांच्या नावाची पाटी, दरवाजावर फुलं...मंत्रालयातील दालन सज्ज
 

  1. राज्याचं सरकार आज स्थापन झालं असून, देवेंद्र फडणवीस हे लगेचच सक्रीय झाले आहे.
  2.  येत्या  7, 8 आणि 9 डिसेंबरला राज्याचं अधिवेशन पार पडणार असून, त्यादरम्यानच विधानसभा अध्यक्ष निवडणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 
  3. तसंच महायुती सरकार येण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या लाडक्या बहि‍णींबद्दलही त्यांनी एक मोठी माहिती दिली. खर्चाच्या सर्व तरतुदी करुन निकषात बसणाऱ्या लाडक्या बहि‍णींना येणाऱ्या काळात 2100 रुपये प्रति महा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 
  4. आमच्या सरकारचं विशेष लक्ष नदीजोड प्रकल्प, सौरउर्जेतून 16 हजार मेगा व्हॅट उर्जेची निर्मितीचं ध्येय अशा शाश्वत विकासाच्या प्रकल्पांवर असणार असंही ते यावेळी म्हणाले.
  5. गोवंशाची हत्या केली जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा आम्ही लागू करणार.
  6. मराठा समाजालाही न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं फडणवीस यांनी सांगितलं.
  7. राज्यात आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता मंत्रिमंडलाचा शपथविधी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष होतं. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढच्या 10 दिसांमध्ये हा शपथविधी पार पडेल अशी शक्यता आहे.  
  8. राजकीय संघर्षाबद्दल बोलताना त्यांनी आपण बदल्याचं नाही तर बदल दाखवणारं राजकारण करणार असं ते म्हणाले आहेत. 
  9. विरोधकांची संख्या कमी असली तरी, त्यांच्या संख्येवर आम्ही त्यांचं मुल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडल्यास त्यांचा सन्मान करू असा विश्वासही फडणवीसांनी दिला आहे. 
  10. एकूणच आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पू्र्ण करण्याचा प्रयत्न करणार असून, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं लोकाभिमूख सरकार राज्याला दाखवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 
     

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT