Eknath Shinde: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! CM एकनाथ शिंदे म्हणाले, "फक्त 1500 रुपये नाही, महिलांसाठी..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath Shinde On ladki Bahin Yojana
Eknath Shinde On ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत केली सर्वात मोठी घोषणा

point

...म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले

point

मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेत शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana:  कुणीही मायकेलाल आला तरी, आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. ही योजना वाढत जाईल. मला लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. फक्त 1500 रुपये आम्हाला ठेवायचे नाहीत. माझ्या बहिणींना लखपती बनवायचं आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते मंगेश कुडालकर यांच्या प्रचारसभेत कुर्ल्यात बोलत होते.

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"सर्व सामान्य माणसाच्या व्यथा मला समजतात. आज दीड हजाराचे पाच हफ्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले. विरोधी पक्षाने विचार केला की हा तर निवडणुकीचा जुमला आहे. हे तर काहीच होणार नाही. पण खात्यात जसे पैसे जमा झाले, तसे लगेच पैसे काढण्याची घाई झाली. सरकार पैसे परत घेईल, असं त्यांना वाटलं. हे सरकार देणारं आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आम्हाला माहिती होतं की, आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधी पक्ष पुन्हा अडचणी निर्माण करतील. यासाठी आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. त्यानंतर विरोधक पागल झाले. हे कसं झालं, असा प्रश्न त्यांना पडला", असं शिंदे म्हणाले.

हे ही वाचा >> Optical Illusion: पिंकीच्या गर्दीत हरवले रिंकी! 99 टक्के लोक झाले फेल, दम असेल तर शोधून दाखवा

जनतेला संबोधीत करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आम्ही अॅडवान्स देणारे आहोत, अॅडवान्स घेणारे नाहीत. पहिलं सरकार अॅडवान्स घेणारं होतं आणि आम्ही अॅडवान्स देणारे आहेत. खात्यात पाच हफ्ते भरणारं सरकार आहे. मागील सरकार हफ्ता घेणारं सरकार होतं. आमचं सरकार हफ्ता भरणारी आहे. हा महायुती आणि महाविकास आघाडीतील फरक आहे. जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत. मेट्रो, कारशेडला बंद केलं होतं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Home Gardening Tips: घरात गार्डनिंग करताय? 'या' गोष्टी लक्षातच ठेवा; झाडं कायम राहतील हिरवीगार

रोड, अटल सेतू बंद केलं होतं. कोस्टल रोड, बुलेट ट्रेन बंद केली होती. सर्व बंद करणाऱ्याला तुम्ही मतदान करणार? विकासविरोधी लोकांना मतदान करणार आहेत का? विकासाच्या मारेकऱ्यांना मतदान करणार?, असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला. आम्ही सर्व स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि धडाधड काम सुरु केलं. मुंबईचे सर्व रस्ते काँक्रीटचे करत आहोत. खड्डेमुक्त मुंबई, प्रदुषणमुक्त मुंबई, ट्रॅफीकमुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. महाविकास आघाडीच्या लोकांनी पंधरा वर्षे डांबरामध्ये पैसे खाल्ले, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT