Shrinivas Vanga: शिंदेंनी तिकीट कापलं आमदार ढसाढसा रडला, म्हणाले ''ठाकरेंसारखा देवमाणूस...''
Shrinivas Vanga Palghar Constituency : महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना अक्षरश: रडू कोसळलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
श्रीनिवास वनगा यांचं तिकीट CM शिंदेंनी कापलं
श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर
मीडियासमोर येत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले
Shrinivas Vanga Cried Video: पालघर: पालघर मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तिकीट कापल्याचं समजताच वनगा या मीडियासमोरच ढसाढसा रडू कोसळलं. याप्रकरणी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने बोलताना एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. 'माझे पती हे नैराश्यात गेले असून ते सातत्याने आत्महत्या करण्याबाबत बोलत आहेत.' असं त्या म्हणाल्या. तसंच उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत... असंही पती बोलत असल्याचं वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यावेळी म्हणाल्या. (cm shinde denies ticket to sitting mla from palghar shrinivas vanga breaks down in tears says uddhav thackeray is a godman)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
2018 साली श्रीनिवास वनगा यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट भाजपशी पंगा घेतला होता. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारून भाजपने राजेंद्र गावित यांना तिकीट दिलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून वनगा यांना तिकीट दिलं होतं. पण या पोटनिवडणुकीत वनगांचा निसटता पराभव झाला.
हे ही वाचा>> Rajendra Gavit : पाचव्यांदा पक्ष बदलून शिवसेनेत एन्ट्री, शिंदेंनी उमेदवारी दिलेला हा नेता कोण?
मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वनगा यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा तिकीट दिलं आणि ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पण 2022 साली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत जे बंड केलं त्यामध्ये जे आमदार पहिल्याच वेळेस शिंदेंसोबत सूरत गेले त्यात श्रीनिवास वनगा यांचा समावेश होता.
हे वाचलं का?
दरम्यान, आपण शिंदे गटात असल्याने आपलं तिकीट कापलं जाणार नाही अशी आशा श्रीनिवास वनगा यांना होती. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात घेत शिंदेंनी श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं.
अन् वनगा ढसाढसा रडले
एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारे तिकीट कापणं हे श्रीनिवास वनगा यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं. याबाबत जेव्हा ते मीडियाशी बोलायला आले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यासमोर आपले अश्रूही रोखता आले नाही..
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Dheeraj Ghate Kasba : हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला... उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी
'प्रामाणिकपणाचं हे फळ आम्हाला मिळालं?' असा सवालही त्यांनी मीडियाच्या माध्यामातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
ADVERTISEMENT
विरोधकांनी साधला शिंदेंवर निशाणा
दरम्यान, यानंतर तात्काळ विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. श्रीनिवास वनगा यांचा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी मार्मिक शब्दात टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT