Maharashtra Vidhan Sabha : "सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय?", काँग्रेसचे साँग, महायुतीवर वार

मुंबई तक

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या रॅप साँगमध्ये काय आहे?
काँग्रेसने रॅप साँँगमधून महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसने विधानसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं

point

रॅप साँगमधून काँग्रेसने महायुतीला केले लक्ष्य

point

काँग्रेसच्या गाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बाण

Congress Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'सत्तेतल्या बोक्याने मस्ती आली काय, आला खोक्यांनी पैसा म्हणून जास्त झाल काय?', असे म्हणत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसने महायुती सरकारला रॅम साँगमधून लक्ष्य केले आहे. नेमके हे गाणे काय आहे, त्यात काय म्हटलं आहे, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (A campaign song released by Congress ahead of Maharashtra Vidhan Sabha election 2024)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग येताना दिसत आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कंबर कसली असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून प्रचाराची लाईन ठरवली जाताना दिसत आहे. अशातच काँग्रेसनेही एक साँग रिलीज करत महायुतीवर पहिला वार केला आहे. 

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत खडाजंगी, डीपीडीसी बैठकीत काय घडलं?

काँग्रेसच्या 'रॅप साँग'मध्ये काय?

2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. त्यावेळी आमदारांनी पन्नास खोके घेतल्याचे आरोप झाले. याच खोक्यांचा उल्लेख या गाण्यात करण्यात आला आहे. 'आला खोक्यांनी पैसा म्हणून जास्त झालंय का', असे म्हणत काँग्रेसने महायुतीविरोधात प्रचाराचे रणशिंग फुकलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> 'लाडका भाऊ योजने'चे नियम आहेत कडक, छोटी चूकही पडेल महागात 

विविध परीक्षांचे वाढलेले शुल्क, पेपर फुटी आणि इतर घोटाळे यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही या गाण्यातून मांडण्यात आला आहे.

 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांवर 'बाण'

या गाण्यातून काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. फडणवीस यांना भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून चाणक्य संबोधले जाते. त्यावर फडणवीसांचा फोटो दाखवत या गाण्यात म्हटलं आहे की, 'चाणक्य म्हणलं म्हणून लय मस्ती आली काय? मी पुन्हा माज मोडेन इतका सोपा वाटलो काय?'

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT