homepage_banner

Devendra Fadnavis: 'परिस्थिती पाहून आम्ही...', मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांचं मोठं विधान, शिंदेंचं टेन्शन वाढवलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (फाइल फोटो)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

point

मुंबई तकच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

point

"कमळसोबत धनुष्यबाण आणि घड्याळ याचाही प्रचार..."

Devendra Fadnavis Interview: 'सर्वांना वाटतंय की आमचे नंबर कमी झाले, तर आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार नाही. राज ठाकरे म्हणतात भाजपचा मुख्यमंत्री होईल, मनसेचा पाठिंबा राहील आणि आम्हीही सत्तेत येऊ. भाजपचा मुख्यमंत्री होईल की नाही?', यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,  "मी तुम्हाला दाव्याने सांगतो, महायुतीचा मुख्यमंत्री होईल. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजित पवार त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाकडून राष्ट्रीय अध्यक्षाला अधिकार दिले जातात. कोण मुख्यमंत्री बनेल, हे तिघेही मिळून ठरवतील". 

फडणवीस पुढे म्हणाले, "ते ज्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवतील, त्यांना सर्व लोक स्वीकारतील. प्रत्येक पक्षाला वाटतं की मला जास्त जागा मिळाव्यात. माझे जास्त आमदार निवडून यावेत, यामध्ये अस्वाभाविक काय आहे. मुख्यमंत्री पदासाठी नंबर, स्ट्राईक रेट असा कोणताच फॉर्म्युला तयार नाही. परिस्थिती पाहून आम्ही ठरवू.

हे ही वाचा >> Raj Thackeray: "उद्धव ठाकरे काँग्रेस-एनसीपीसोबत गेल्यावर...", पहिल्याच सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली

2019 मध्ये तुमचा निवडणूक प्रचाराचा स्तर वेगळा होता. यावेळी तुमच्या कॅम्पेनची पद्धत वेगळी आहे. तीन पक्ष तुमच्यासोबत आहेत. या निवडणूक प्रचाराकडे तुम्ही कसं पाहता? मी पुन्हा येईन असं यावेळी नाही, आम्ही परत येऊ, अशाप्रकारचा प्रचार दिसणार आहे का? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक असते. कोणतीही निवडणूक खूप सोपी असते, असं आम्हाला वाटत नाही. आमच्यासमोर आव्हानं आहेत. जनता आमच्या सोबत आहे. आम्ही ही निवडणूक जिंकू, अशी परिस्थिती ग्राऊंड लेव्हलला दिसते."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mahim: अमित ठाकरेंना लढाई आणखी कठीण, सदा सरवणकरांचा सर्वात मोठा निर्णय!

आमच्या कमळसोबत धनुष्यबाण आणि घड्याळ याचाही प्रचार आम्ही करणार. आमच्या मित्रांना सोबत घेऊन आम्हाला जिंकायचं आहे. सरकारी योजना, इन्फ्रास्ट्रक्चर आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत? या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही आमचं कॅम्पेन सुरु केलं आहे. मला वाटतं ते लोकापर्यंत पोहचेल.तीन पक्षांचं कॅम्पेन वेगळं असंत. कारण आमच्या कोणत्याही होर्डिंग बघा, त्यात तुम्हाला मुख्यमंत्र्याचा फोटो दिसेलच. अजित पवारांचाही फोटो तुम्हाला दिसेल. कोणतीही योजना ही सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करतो, असंही फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT