Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता असताना हा कार्यक्रम होत असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल
दादार दीपोत्सवामुळे आचारसंहितेचा भंग : शिवसेना उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू केल्याचा माहिती
Uddhav Thackeray Shiv Sena Vs Amit Thackeray : मनसेच्या शिवाजी पार्कमधील दिपोत्सवावर आक्षेप घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता राजपुत्राची उमेदवारी अडचणीत येणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही हा दीपोत्सव साजरा होतोय. मात्र एकीकडे विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता असताना हा कार्यक्रम होत असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा >>Arvind Sawant : उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात FIR, शायना एनसी म्हणाल्या...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून उत्तर आलं आहे. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीप्रकरणी तसंच कार्यक्रमाच्या संपूर्ण खर्चाची चौकशी सुरू करण्यात आली आहे" असं पत्र शिवसेना उद्धव पक्षाला पाठवण्यात आल्याचं समोर आलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Sanjay Raut : रश्मी शुक्ला आमचे फोन ऐकतायत... निवडणुकीच्या तोंडावर फोन टॅपिंगचे आरोप, राऊतांचा फडणवीसांवरही निशाणा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे दादर माहिम मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. तर इथेच असलेल्या शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून लाईटींग लावून लखलखाट करण्यात येतो. हा परिसर सजवून काही दिवस तिथे वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतात. याच शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचं निवासस्थान सुद्धा आहे. दादरमध्ये होत असलेल्या या दीपोत्सवाच्या खर्चाचा समावेश अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात करावा तसंच इथे आचारसंहितेचा भंग होतोय असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT