Gajanan Kirtikar : 'वायकरांचा विजय संशयास्पद', गजानन कीर्तिकर हे काय बोलून गेले?
Gajanan Kirtikar On Ravindra Waikar : निवडणूक निर्णय अधिकारी नेमताना काही निकष जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असतात. वंदना सुर्यवंशी सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी आरओ म्हणून नेमलं कोणी? कोणी शिफारस केली? ही कलेक्टरची मोठी चूक असल्याचे देखील कीर्तिकरांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
Gajanan Kirtikar On Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) विजयी ठरले आहेत. वायकरांच्या या विजयावर आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून संशय व्यक्त होत होता. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेच्या एका माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी वायकरांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर कीर्तिकरांनी ठाकरेंना कोर्टात जाण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ माजली आहे. (gajanan kirtikar on ravindra waikar north west mumbai lok sabha result amol kirtikar ro vandana suryvanshi udhhav thackeray shiv sena)
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर पराभूत झाले आहेत. या पराभवानंतर ठाकरे गटाने वायकरांच्या विजयावर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार आणि अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टीवर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दानवेंनी दिली मोठी बातमी, कोअर कमिटीमध्ये निघाला मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय
गजानन कीर्तिकर यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत मुंबई उत्तर पश्चिमेच्या निकालावर बोलताना कीर्तिकर यांनी निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच उत्तर पश्चिममध्ये मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांना वंदना सुर्यवंशी यांना निर्णय अधिकारी म्हणून नेमले होते.
या वंदना सुर्यवंशीची पार्श्वभूमी काय आहे? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. त्या संशयास्पद अधिकारी आहेत. त्यांच्याकडून ही संशयास्पद कृती झाली आहे,असा आरोप कीर्तिकरांनी केला आहे.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी नेमताना काही निकष जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असतात. वंदना सुर्यवंशी सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी आरओ म्हणून नेमलं कोणी? कोणी शिफारस केली? ही कलेक्टरची मोठी चूक असल्याचे देखील कीर्तिकरांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Vijay Waddetiwar : ''सगेसोयरे टीकणार नाही मग जीआर कशाला काढताय''
संशयास्पद कृतीबद्दल यांना कोर्टात दाद द्यावी लागेल. यांनी (ठाकरेंनी) आता कोर्टात दाद मागायला हवी. त्यांना (आरओ) निवडणूक आयोगाकडे दाद द्यावी लागेल,असा सल्ला देखील कीर्तिकरांनी ठाकरेंना दिला आहे. तसेच जो कोर्टाचा निर्णय आला की तो स्वीकारावाच लागतो. आम्ही तो स्वीकारू असे देखील गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT