Maharashtra Vidhan Sabha : राज्याची विधानसभा निवडणूक 'या' 5 मुद्द्यांभोवती फिरणार, कुणाला फटका बसणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या मुद्द्यांची चर्चा होणार?

point

विधानसभेला कोणते विषय महत्वाचे ठरणार?

point

राज्याची विधानसभा निवडणूक या 5 मुद्द्यांभोवती फिरणार

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर महायुतीच्या पदरी निराशाच पडली होती. त्यानंतर मात्र महायुती सरकारने अॅक्शन मोडमध्ये येत अनेक महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या. विशेषत: लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेचं कारण ठरली. त्यामुळे लोकसभेपेक्षा हे निकाल वेगळे असणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर मतदार भाजपवर नाराज असून, महायुतीला त्याचा फटका बसेल असं मविआचं म्हणणं आहे. तर तीच महाविकास आघाडी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ही विधानसभा निवडणूक लढताना दिसत आहे. तर महायुतीने कल्याणकारी योजना आणि विकासाच्या मुद्द्यांच्या माध्यमातून प्रचार करतााना दिसत आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? जाणून घेऊ.


1. शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा मोठा भाग आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. तर मुंबई, ठाणे-कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने या भागापेक्षा दोन ते तीन पटीने अधिक श्रीमंत आहेत. 2022 मध्ये देशातील सर्वाधिक 37.6 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या, तर आर्थिक वर्ष 22-23 साठी 13.3 टक्के देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदानही महाराष्ट्राने दिलंय. विदर्भ आणि मराठवाडा हे शेतकरी आत्महत्येचं केंद्र असून, कायम दुष्काळाचा सामना करत आहे. मराठा आणि अर्थातच प्रभावशाली जातीने आरक्षणाची मागणी करण्यामागे हे देखील एक महत्वाचं कारण आहे. पाण्याची टंचाई, पिकांचे कमी दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किफायतशीर दर असतानाही कांद्याच्या निर्यातीवर बंदी हे मुद्देही महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागांमध्ये महायुती मविआच्या मागे असल्याचं दिसतं. कदाचित यामुळेच महायुतीने शेतकरी सन्मान योजनेच्या 12,000 रुपयांमध्ये वाढ करुन 15,000 रुपये करण्याचे आश्वासन दिलं आहे.तर मविआनेही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय.

ADVERTISEMENT


2. पक्षफुटीचा फटका कुणाला बसणार?

ADVERTISEMENT

राज्यात सध्या अस्तित्वात असलेली महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही अनैसर्गिक असल्याचं दिसतं. कारण कधीकाळी काँग्रेसवर टीका करणारी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली आहे. तर दुसरीकडे ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच राष्ट्रवादीसोबत भाजपने युती केली. त्यामुळे आता मतदार कुणावर विश्वास ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे

 

हे ही वाचा >>Maharashtra Vidhan Sabha Survey : राज्यातल्या 'या' 10 जिल्ह्यांमध्ये मविआ आघाडीवर? काय सांगते आकडेवारी?

 

3. मराठा विरुद्ध ओबीसी

राज्यात वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या मराठा आंदोलनामुळे महायुतीचं लोकसभेला नुकसान झाल्याचं बोललं जातं. विशेषत: मराठवाड्यात अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसला. मनोज जरंगे पाटील यांनी मराठ्यात महुयातीच्या काही उमेदवारांना पाडण्याचं थेट आवाहन केल्याचं दिसलं. तर दुसरीकडे त्याच मराठवाड्यात महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तयार झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे आता मराठा उमेदवारांना ओबीसी मतांचा फटका  बसण्याचीही शक्यता आहे. तसंच ओबीसी उमेदवारांना मराठा मतदार विरोध करताना दिसतायत. त्यामुळे या मतांचं गणित नेमकं कुणाच्या फायद्याचं ठरतं याचं प्रत्येक मतदारसंघात वेगळं उत्तर असणार आहे.


4. अपक्ष आणि बंडखोर

 

यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआ वगळता इतर पक्षांचा, अपक्ष उमेदवारांचा, बंडखोरांचाही आकडा मोठा आहे.लहान पक्षांची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जन सुराज्य शक्ती, बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, ऑल एमआयएमयासारखे छोटे पक्ष असणार आहेत. गेल्या पाच निवडणुकांमध्ये सरासरी 25 टक्के मतांसह या सर्व घटकांनी 30 च्या आसपास जागा जिंकलेल्या दिसतात. त्यामुळे यंदाही यांचा आकडा मोठा असेल अशी शक्यता आहे.

5. मराठी विरुद्ध गुजराती

 

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे आठ टक्के नागरिक स्थलांतरित आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांच्या नागरिकांचा आकडा मोठा आहे. मुंबईत स्थलांतरित लोकसंख्येच्या आकडा 43 टक्के एवढा आहेत तर मुंबईच्या लोकसंख्येपैकी सुमारे 42 टक्के लोक महाराष्ट्रीय किंवा मराठी आहेत. यामध्ये गुजराती लोकांचे प्रमाण सुमारे 19 टक्के आहे. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहेत. प्रादेशिक पक्ष फोडून बेकायदेशीरपणे सत्ता काबीज केल्याचा आरोप भाजपवर करत आहेत. तसंच फॉक्सकॉन, वेदांतायासह अनेक विकासप्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेत हा मुद्दाही वारंवार उपस्थित केला जातोय. त्यामुळे मुंबईसह राज्यात मराठी विरुद्ध गुजराती असंही चित्र निवडणुकीत दिसेल अशी शक्यता आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT