Maharashtra CM Oath Ceremony Online : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा थेट कुठे पाहायचा?
Watch Maharashtra CM Oath Online : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून आज ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस राज्याचे 21 वे मुख्यमंत्री होणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आज देवेंद्र फडणवीस घेणार राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

फडणवीस होणार राज्याचे 21 वे मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे पाहाल?
Maharashtra CM Oath-Taking Ceremony online : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून आज ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस राज्याचे 21 वे मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात सायंकाळी 5.30 वाजता पार पडणार आहे. हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा अनेक सर्वजनिक ठिकाणी (बस स्टॉप आणि थिएटर) मध्ये लईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहता येणार आहे. या सोहळ्याला 60 हजारांहून जास्त महायुतीचे समर्थक उपस्थित राहणार असल्याचं समजते. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
तसच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सितारमण आणि जे पी नड्डा या दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती आहे. तसच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांचीही विशेष उपस्थिती राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, प्रसिद्ध गायक कैलाश खेर आणि अजय अतुल या सोहळ्यात गायन करणार आहेत. तसच 100 हून अधिक महंता आणि नेतेही या शपथविधी सोहळ्याची शान वाढवणार असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >. Shiv Sena Ministers: शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, पण एकनाथ शिंदेंचं काय?
शपथविधी सोहळा थेट कुठे पाहाल?
राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीने जोरदार तयारी केली असून जवळपास 30-40 हजार लोक बसतील, एवढा मोठा मंडप आझाद मैदानात उभारण्यात आला आहे. हा शपथविधी सोहळा अनेक सर्वजनिक ठिकाणी (बस स्टॉप आणि थिएटर) मध्ये लईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची वेळ?
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात सायंकाळी 5.30 वाजता सुरु होणार आहे. आझाद मैदानात महायुतीने 100 बाय 100 असा मोठा स्टेज उभारला असून त्याच्या बाजूला दोन वेगळे स्टेज उभे केले आहेत. हा स्टेज भगव्या रंगांनी सजवला असून महायुती आझाद मैदानात आझ विजयाचा गुलाल उधाळणार आहे.