Shrinivas Vanaga on Ek Nath Shinde'चूक झाली, मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला.. मी आत्महत्या...', आमदार वनगांच्या पत्नीने उडवून दिली खळबळ
Shrinivas Vanaga on Ek Nath Shinde: शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्याने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज झाले आहेत. ज्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी काही खळबळजनक विधानं केली आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारली
श्रीनिवास वनगा यांनी CM शिंदेंवर केले गंभीर आरोप
वनगांच्या पत्नीने केले खळबळजनक विधान
Shrinivas Vanaga Cried: पालघर: 'ते कालपासून वेड्यासारखं वागतात.. आत्महत्या करणार असंच बोलतात.. बोलतात माझं आयुष्य संपून गेलं.. माझी चूक झाली की मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला.' असं खळबळजनक विधान शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या श्रीनिवास वनगा यांना अशी अपेक्षा होती की, पालघरमधून त्यांनाच पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळेल. पण ऐनवेळी राजेंद्र गावित यांना भाजपमधून शिवसेनेत घेत शिंदेंनी त्यांना तिकीट दिलं आणि श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं. ही गोष्ट श्रीनिवास वनगा यांच्या अत्यंत जिव्हारी लागली असून ते ढसाढसा रडत होते.
दरम्यान, यानंतर मीडियाशी बोलताना श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी थेट अशी विधानं केली आहेत. पाहा सुमन वनगा नेमक्या काय म्हणाल्या.
हे वाचलं का?
'ते पूर्णपणे नैराश्यात गेलेले आहेत. त्यांचं काही बरं-वाईट झालं तर मी...'
'माझे मिस्टर श्रीनिवास वनगा.. हे त्यांच्या पालघर विधानसभेत व्यवस्थित काम करत होते. फक्त ते प्रसिद्धी करत नव्हते. त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की, त्यांना उमेदवारी मिळेल त्या पद्धतीने ते बांधणी करत होते. ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. ज्यावेळेस ते माझ्या मुलाचा वाढदिवस होता 20 तारखेला तेव्हा ते तिकडे गेले आणि तेव्हा त्यांना सांगितलं.. त्यांना शब्द पण दिला होता की, तुम्हाला आम्ही परत घरी नाही बसवणार.. तुमच्यासाठी आम्ही आहोत.'
हे ही वाचा>> Shrinivas Vanga: शिंदेंनी तिकीट कापलं आमदार ढसाढसा रडला, म्हणाले ''ठाकरेंसारखा देवमाणूस...''
'परंतु तो शब्द पाळला नाही.. आणि कालपासून ते जेवत पण नाही.. बोलत नाही.. वेड्यासारखं वागतात.. आत्महत्या करणार असंच बोलतात.. बोलतात माझं आयुष्य संपून गेलं.. ज्या माणसाने मला.. देवमाणूस होते उद्धव साहेब...'
ADVERTISEMENT
'त्यांचं सारखं (उद्धव ठाकरे) नाव घेतात माझे पती.. आणि सांगतात माझी चूक झाली की मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. त्यांनी मला शब्द दिलेला... 39 आमदारांचं पुनर्वसन केलं.. पण माझ्या पतीचं काय चुकलं?'
ADVERTISEMENT
'दोन-तीन दिवस झाले जेवतच नाही.. फक्त मरायच्याच गोष्टी करत आहेत. आई सांगते, मी सांगते पण ऐकतच नाही.. त्यांना आधी तिकीट देणार नंतर सांगितलं की, डहाणू मतदारसंघातून देणार.. तरी आज देखील त्यांचं नाव आलं नाही. त्यामुळे ते फार दु:खी झाले आहेत.'
हे ही वाचा>> Sushma Andhare Tweet : "विध्वंसक प्रवृत्तीशी संग..", शिंदेंनी विद्यमान आमदाराचं तिकीट कापताच सुषमा अंधारे कडाडल्या
'ते पूर्णपणे नैराश्यात गेलेले आहेत. त्यांचं काही बरं-वाईट झालं तर मी कोणाला जबाबदार ठरवू?' असं सुमन वनगा यावेळी म्हणाल्या.
CM शिंदेंकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: प्रयत्न केले असल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, वनगांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT