Laxman Hake : जरांगेंची विधानसभेतून माघार, लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले, "गनिमी काव्याचा...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांची माघार, हाकेंचा पहिला वार

point

लक्ष्मण हाके विधानसभेला कुणाला पाठिंबा देणार?

point

मनोज जरांगे यांनी पळ काढल्याचा आरोप

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 3 नोव्हेंबरररोजी मनोज जरांगे आपले उमेदवार जाहीर करणार होते, मात्र त्यांनी आज 4 नोव्हेंबररोजी आपण ही निवडणूक लढणार नाही असं ठरवलं. तसंच आपल्या सर्व समर्थकांनी भरलेले फॉर्म मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर आता  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या रणांगरणातून पळ काढला असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. तसंच आम्ही 70 जागांवर महत्वाची भूमिका घेणार असून, काही उमेदवारांना पाठिंबा देऊ आणि काही लोकांना पराभूत करू असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Nawab Malik : शिंदे-पवारांची चर्चा सुरू? विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला

 

मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहिले असते, तर धुळधाण उडाली असती, त्यामुळे बारामतीच्या सांगण्यावरुन त्यांनी आता या निवडणुकीतून पळ काढला असं लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांच्याकडे आता गनिमी काव्याचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही. पण गनिमी काव्याचा काळ गेला आहे, त्यांनी गनिमी काव्याला बदनाम करु नये असं लक्ष्मण हाके म्हणाले. मंडल आयोगाला आव्हान देतो म्हणणारा माणूस, ओबीसींच्या घरांवर हल्ला करणार माणूस असं म्हणत हाके यांनी जरांगेंवर आरोप केले. मनोज जरांगे यांनी आजच माघार नाही घेतली, तर नवी मुंबईतून देखील त्यांनी मोर्चा माघारी आणला होता. जत्रा भरवण्याएवढं निवडणूक लढवणं सोपं नाही असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!

 

 

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवरही निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांना रात्री जाऊन भेटणाऱ्या, आर्थिक मदत पुरवणाऱ्या, गाड्या पुरवणाऱ्या आणि त्यांना लेखी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम इथला ओबीसी, एससी, एसटी, भटका आणि मुस्लीम समाज करणार आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. जे लोक संविधानाची, आरक्षणाची, ,सामाजिक मागासवर्गीयांची भाषा करतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असंही लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांना रात्री अपरात्री भेटणाऱ्या सर्व लोकांची यादी आम्ही तयार केली असून, आम्हीही कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला पाडायचं हे सांगणार आहोत असं लक्ष्मण हाके म्हणाले.  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT