Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा
Manoj Jarange On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे.
मनोज जरांगे यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरेल
लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा महायुतीला बसला मोठा फटका
Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल सत्ताधाऱ्यांना देणारे, तर विरोधकांना बळ देणारे ठरले. त्यामुळेच महायुतीने पुन्हा सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. अशात मराठवाड्यात निर्णायक ठरलेल्या मनोज जरांगे यांनी एक विधान करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या चिंतेत भर घातली आहे. (Manoj Jarange Prediction about Maharashtra Vidhan Sabha election 2024)
ADVERTISEMENT
बीडसह मराठवाड्यात जातीय संघर्ष धुमसताना दिसत आहे. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जनजागृती शांतता यात्रा सुरू केली आहे. वेगवेगळ्या भागात जाऊन मनोज जरांगे सरकारला इशारा देताहेत, तर समाजाला शांततेचं आवाहन करत आहेत.
मनोज जरांगे विधानभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
नांदेडमध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीचे सरकार पडले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आंदोलन चालूच राहील की बंद होईल?असा प्रश्न माध्यमाच्या प्रतिनिधिने मनोज जरांगेंना विचारला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!
या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की,
"आमचंच उभं राहणार आहे. आमचे लोक सर्व जाती-धर्माचे लोक उभे करून आम्ही आमचंच सरकार आणणार आहोत. आम्ही सगळ्या जातींना आरक्षण देणार आहोत. सगळ्या जातींना... ज्यांचे राहिले आहे. कैकाडी समाज, राजपूत समाज, वडार समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुस्लीम, दलित... ज्यांचे ज्यांचे प्रश्न राहिलेत. बारा बुलतेदारांचे, बंजारा बांधवांचा वेगळा प्रश्न आहे. आम्ही आमचेच सरकार बनवणार आणि वेगळा प्रवर्ग करणार."
विधानसभा निवडणुकीबद्दल जरांगेंची भूमिका काय?
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भूमिका मांडताना स्पष्ट केलेले आहे की, २८८ जागा लढणार किंवा आमदारांना ठरवून पाडणार. याबद्दलची स्पष्टता मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर होईलच, पण त्यांच्या भूमिकेचा सत्ताधारी महायुतीला फटका बसू शकतो, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर ठरला निर्णायक
मराठवाड्यात ८ लोकसभा मतदारसंघ आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने आठही जागा जिंकल्या होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर धक्का बसला. मराठवाड्यातील आठ जागांपैकी फक्त एकच जागा महायुतीला मिळाली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! शिंदेंमुळे कुणाची जागा धोक्यात?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे निवडून आले. इतर सात जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे जे मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे राहिले. तिथेही महाविकास आघाडीने विजय मिळवला.
जालना, बीड, लातूर, नांदेड या चार लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार होते. तर धाराशिव, परभणी, हिंगोली इथे शिवसेनेचे खासदार होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.
हेही वाचा >> एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत?
मनोज जरांगे आणि मराठा मतदारांची भूमिका लोकसभा निवडणुकीत खूप महत्त्वाची ठरली. आता ओबीसी नेतृत्वही आक्रमक होऊ लागले आहे. दुसरीकडे जरांगे स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करत आहे. त्यामुळे मराठवाड्यात तरी जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असेच सध्या दिसतेय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT